Menu Close

अण्वस्त्र आक्रमण काय असते, ते भारताला दाखवून देऊ ! – पाकचे परराष्ट्रमंत्री असिफ ख्वाजा

पाककडून वारंवार अशा धमक्या ऐकणे, हे सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या भारतीय सरकारला लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

 

 

 

इस्लामाबाद : अण्वस्त्र आक्रमण काय असते ते भारताला दाखवून देऊ, अशी धमकी पाकचे परराष्ट्रमंत्री असिफ ख्वाजा यांनी ट्विटरवरून दिली.

भारताचे सैन्यप्रमुख बिपीन रावत यांनी पाककडून देण्यात येणारी अण्वस्त्र आक्रमणांची धमकी पोकळ आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. याला आसिफ ख्वाजा यांनी ट्वीट करून उत्तर दिले.

या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे, भारताच्या सैन्यप्रमुखांनी केलेले वक्तव्य अत्यंत दायित्वशून्य आहे. त्यांचे हे वक्तव्य आमच्या अण्वस्त्र आक्रमणांना दिलेले आमंत्रण आहे, असे वाटते. आम्ही पोकळ धमकी देत नाही. रावत यांची इच्छा असेल, तर आमच्या अण्वस्त्र आक्रमणाचा अनुभव ते घेऊ शकतात. त्यामुळे त्यांची शंका दूर होईल. इंशाल्लाह. पाकच्या तत्कालीन संरक्षणमंत्र्यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये भारताला अण्वस्त्र आक्रमण करण्याची धमकी दिली होती. त्या वेळी अमेरिकेसह जगभरातील राष्ट्रांनी पाकची कानउघाडणी केली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *