Menu Close

जुने गोवा येथील हातकातरो खांबाच्या कठड्याची डागडुजी करा !

हिंदु जनजागृती समितीची सार्वजनिक बांधकाम खाते आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

पर्यटनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणार्‍या गोवा राज्यात अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून हे का करत नाही ?

पणजी : जुने गोवा येथील हातकातरो खांबाच्या मोडकळीस आलेल्या कठड्याची डागडुजी करणे, तसेच खांबाचे जतन करण्यासाठी खांबाच्या बाजूने लोखंडी कुंपण घालणे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने सार्वजनिक बांधकाम खाते आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, हातकातरो खांब हे गोमंतकातील स्वाभिमानी हिंदूंनी दिलेल्या बलीदानाचे प्रतीक आहे; मात्र या ऐतिहासिक खांबाची दुरवस्था झाली आहे. या खांबाचे जतन करण्याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. आता या खांबाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले आहेत आणि त्यामुळे खांबाच्या कठड्याचा बराच भाग कोसळला आहे. या ठिकाणी अन्य एखादा अपघात झाल्यास या खांबाचे अस्तित्व नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या कठड्याची डागडुजी करण्यासह खांबाचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवणारा माहितीफलकही तेथे लावावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *