भोपाळ : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील अधिवक्त्यांचे हिंदु राष्ट्र आणि साधना याविषयी प्रबोधन करण्यात आले. या बैठकीला १२ अधिवक्ते उपस्थित होते. सर्व अधिवक्त्यांनी चर्चेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. अधिवक्ता भरतसिंह तोमर आणि त्यांचे सहकारी मित्र यांनी येथे या बैठकीचे आयोजन केले होते.
हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश राज्याचे समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयांवर माहिती दिली. श्री. व्हनमारे म्हणाले, मनुष्य जीवनाचा उद्देश आनंदाची प्राप्ती करणे हा आहे. यासाठी धर्माचरण करत राष्ट्र आणि धर्म यांची सेवा करणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सेवा म्हणून योगदान दिल्यास त्यातून साधना होऊ शकते. हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनीही जीवनातील सुख-दु:खाच्या प्रसंगात स्थिर रहाण्यासाठी साधनेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले, तसेच उपस्थित अधिवक्त्यांना राष्ट्र-धर्मकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
क्षणचित्र
बैठकीतील विषय ऐकून अधिवक्ता तोमर आणि त्यांचे सहकारी यांनी भोपाळ येथील बार असोसिएशन मध्ये तणावमुक्तीसाठी अध्यात्म या विषयावर व्याख्यान आयोजित करण्याचे ठरवले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात