बांगलादेशमध्ये चालू असलेला मध्ययुगीन काल !
या चित्राद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून केवळ विडंबन काय केले आहे, ते समजावे यासाठी चित्र प्रकाशित करत आहोत. – संपादक
ढाका : नारायणगंज जिल्ह्यातील रूपगंज उपजिल्ह्यामध्ये धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली. धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मूर्तीचे शिर तोडले, तसेच तेथील इतर मूर्तींचीही तोडफोड केली. या मंदिराचे पुजारी श्री. प्रफुल्ल रॉय यांच्या समक्ष मूर्तींची तोडफोड करण्यात आली. श्री. रॉय यांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता तोडफोड केलेल्या मूर्ती भूमीवर फेकल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारही प्रविष्ट करून घेतली नाही.
‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्यांचे सहकारी श्री. दिलीप रॉय आणि ‘हिंदु हेरिटेज फाऊन्डेशन’चे सचिव श्री. माणिकचंद्र शर्कार यांच्यासह मंदिराला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी रूपगंज पोलीस ठाण्याला भेट देऊन मंदिरावरील आक्रमणाविषयी चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करून घेण्यास टाळाटाळ करणार्या पोलीस अधिकार्यांनी तक्रार प्रविष्ट करून घेतली. हिंदु देवतांची तोडफोड करणार्या गुन्हेगारांना तातडीने अटक करून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अधिवक्ता रवींद्र घोष यांनी या वेळी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात