Menu Close

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदु मच्छीमारांवर केलेल्या आक्रमणात ५ महिला गंभीररित्या घायाळ !

मुसलमानबहुल बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने असुरक्षित !

बांगलादेशमधील हिंदूंवरील वाढत्या अत्याचारांविषयी केंद्र सरकार एका शब्दाने बांगलादेशला समज देत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

लोहगोरा : बांगलादेशच्या नोरेल जिल्ह्यातील लोहगोरा शहरात धर्मांधांच्या ३० ते ३५ जणांच्या जमावाने हिंदु मच्छीमारांच्या घरांवर आक्रमण केले. धर्मांधांनी धारदार हत्यारांसह त्यांच्या घरांत घुसून हिंदु महिला आणि मुली यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये ५ महिला गंभीररित्या घायाळ झाल्या. त्यांना उपचारासाठी लोहगोरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धर्मांधांच्या जमावाने हिंदूंच्या घरांची मोडतोड करून आतील मौल्यवान वस्तू पळवल्या. या आक्रमणाच्या विरोधात नमिता बिस्वास या हिंदु महिलेने लोहगोरा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या आक्रमणाविषयी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना माहिती मिळताच त्यांनी लोहगोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी महंमद शफीकुल इस्लाम यांच्याशी संपर्क साधून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. ‘बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण झाले पाहिजे. या आक्रमणात गंभीररित्या घायाळ झालेल्या पीडित हिंदु महिलांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्यात’, असेही अधिवक्ता घोष यांनी पोलीस अधिकार्‍यांना सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *