-
निपाणी (जिल्हा बेळगाव) येथील विराट हिंदू महासंमेलनाला युवकांचा उदंड प्रतिसाद !
-
महासंमेलनाला १० सहस्र हिंदूंची उपस्थिती !
निपाणी : देशातील सर्व पक्षांचे राजकीय नेते हिंदूंचा स्वार्थासाठी वापर करून घेत आहेत. हिंदूंवर त्यांच्याकडूनच अन्याय आणि अत्याचारही चालू आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठीही हिंदूंचा वापर होत आहे. हिंदूंनी किती दिवस हे सहन करायचे ? आता हिंदु राष्ट्र, धर्म, संस्कृती रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होऊन पुढे येण्याची आवश्यकता आहे, असे उद्गार साध्वी सरस्वती (मध्य प्रदेश) यांनी काढले. १३ जानेवारीला येथे श्रीराम सेनेच्या वतीने आयोजित विराट हिंदू महासंमेलनात त्या बोलत होत्या.
संत आणि मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महासंमेलनास प्रारंभ झाला. श्रीराम सेनेच्या मान्यवर वक्त्यांनी सरकार आणि प्रशासन यांच्यावर जोरदार आक्रमण केले. अधिवक्ता नीलेश हत्ती यांनी प्रास्ताविक केले.
साध्वी सरस्वती पुढे म्हणाल्या की,
१. सरकार, प्रशासन जाणीवपूर्वक आतंकवादी, मुसलमानांना पाठीशी घालत आहे. लव्ह जिहादमुळे सहस्रो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. गोमाता, भारतमाता, महिला यांच्या रक्षणाचे दायित्व प्रत्येकाचे आहे.
२. हिंदूंच्या मतांसाठी सरड्याप्रमाणे रंग पालटणारे राजकारणी आज दिसत आहेत. भारतमातेचे रक्षण करणार्यांना जर भगवा आतंकवादी म्हणत असतील, तर ते आम्हाला स्वीकारार्ह आहे. देश, धर्म आणि संस्कृतीला वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे.
पाकिस्तानची घुसखोरी चालू देणार नाही ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष
धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी हिंदु समाज एकत्रित यावा, यासाठीच महासंमेलन आयोजित केले आहे. आम्ही आतंकवादी नाही; मात्र मुख्यमंत्र्यांना तसे दिसत आहे. यापुढे पाकिस्तानची घुसखोरी चालू देणार नाही. समानता, एकता आणि सर्वांनी सुखी रहावे, ही इच्छा बाळगणारा हिंदु धर्म आहे. संत आणि महंत यांनी जगाला शांती अन् मोक्ष यांचा संदेश दिला आहे.
राष्ट्रभक्ती, देशभक्ती जागृत करून युवकांना व्यसनमुक्त करण्याचा श्रीराम सेनेचा संकल्प ! – रमाकांत कोंडुस्कर
भारतीय संविधानाने आम्हाला Right of Speech आणि Right of Expression हा अधिकार दिला आहे. आम्ही देशभक्त, व्यसनमुक्त युवक समाजनिर्मिती कार्याला वाहून घेतले आहे, देशद्रोही आतंकवादी निर्माण केलेले नाहीत. आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. राष्ट्रभक्ती, देशभक्ती जागृत करून युवकांना व्यसनमुक्त करण्याचा श्रीराम सेनेचा संकल्प आहे.
संतांची वंदनीय उपस्थिती
श्री प्राणलिंग स्वामी, श्री बसवमल्लिकार्जुन स्वामी, श्री कैवल्यानंद स्वामी, श्री बसवराज कल्याणी
मान्यवर
श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, जिल्हाध्यक्ष श्री. रमाकांत कोंडुस्कर, चिक्कोडी तालुका प्रमुख श्री. विक्रम बनगे, मान्यवर सर्वश्री राजीव जाधव, विक्रम मणगेर, कोल्हापूर येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, श्रीराम सेनेचे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निपाणी तालुका अध्यक्ष श्री. नीलेश हत्ती, खानापूर तालुका अध्यक्ष श्री. पंडित ओगले, बेळगाव ग्रामीण अध्यक्ष श्री. रवीकुमार कोकीतकर
क्षणचित्रे
१. साध्वी सरस्वतीजी, श्री. प्रमोद मुतालिक, श्री. रमांकात कोंडुस्कर आणि श्री. पंडित ओगले यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी उपस्थित जिज्ञासूंनी टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रतिसाद दिला.
२. साध्वी सरस्वती यांच्या प्रत्येक वाक्याला सहस्रो युवक टाळ्या वाजवून घोषणा देत होते.
पोलिसांकडून नेहमी हिंदूंवरच दबाव आणला जातो, हे दुर्दैव !
निपाणी येथील विराट हिंदू महासंमेलनात उपस्थित रहाण्याची अनुमती पोलिसांनी एका मान्यवरांना नाकारली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात