पुणे : येथे ४ फेब्रुवारी या दिवशी कै. हनुमंत थोरवे विद्यालय, चंद्रभागानगर चौक, भारती विद्यापीठ, पुणे येथे जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेनिमित्त पुणे शहरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, गणेश मंडळे आणि धर्मप्रेमींची बैठक १० जानेवारी या दिवशी सातारा रस्ता येथील काळुबाई मंदिरामध्ये पार पडली.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी हिंदु धर्माची सद्यस्थिती सांगून हिंदूसंघटनाची आवश्यकता याविषयी उपस्थितांना अवगत केले. श्री. अभिजित देशमुख यांनी हिंदु राष्ट्राची आवश्यकता याविषयी उपस्थितांना अवगत केले. सभेच्या माध्यमातून जास्तीतजास्त हिंदु समाजापर्यंत पोहोचण्याविषयी उपस्थितांशी चर्चा केली.
या बैठकीमध्ये पुणे येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि धर्मप्रेमी असे एकूण ४५ धर्मप्रेमी उपस्थित होते. सर्वांनीच बैठकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि ही सभा केवळ समितीची नसून आपल्या सर्व हिंदूंची आहे, असे सांगून सभेच्या आयोजनासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करणे, सभा यशस्वी होण्यासाठी प्रसार आणि प्रसिद्धी करणे, तसेच प्रसाराच्या दृष्टीने आपापल्या भागात मोठ्या संख्येने बैठका आयोजित करण्याचे आणि फ्लेक्स लावण्याचे निश्चित केले. आवश्यक ते साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करणे आणि साहित्य मिळवणे, तसेच नियोजित सभा ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व गणेशमंडळांची स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.
या बैठकीला काळूबाई मंदिराचे विश्वस्त श्री. निगडे यांनी मंदिर उपलब्ध करून सहकार्य केले. बैठकीस शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. प्रवीण खन्ना, भाजपचे श्री. अरुण काशीद, जितेंद्र कोंढरे, श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. मुकुंद मासाळ, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अधिवक्ता श्री. राजीव देशपांडे, शिवदुर्ग संवर्धन समितीचे श्री. पंडित अतिवाडकर, गोरक्षक श्री. स्वप्नील धांडेकर, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. मोहन महाराज शिंदे, सनातन संस्थेचे प्रवीण नाईक असे विविध धर्मप्रेमी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात