मुंबई : भारत हा हिंदूंचा आहे. या ठिकाणी हिंदूंचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. राणी पद्मावतीचा अपमान हा समस्त हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांचा अपमान आहे. ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला मान्यता दिल्यामुळे २६ जानेवारी हा ‘काळा दिवस’ म्हणून आम्ही घोषित केला आहे. या दिवशी क्षत्रिय समाज झेंडावंदन करणार नाही. ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित झाल्यास प्रजासत्ताकदिनावर बहिष्कार घालू, अशी चेतावणी महाराणा प्रताप बटालियनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजयसिंह सेंगर यांनी शासनाला दिली आहे. ‘दैनिक सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी दूरभाषवर बोलतांना त्यांनी ही चेतावणी दिली आहे.
या वेळी श्री. अजयसिंह सेंगर पुढे म्हणाले की,
१. मुसलमान संघटनांनी मागणी केल्यावर ‘हलाला’ चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्यात आली. मुसलमानांची मते मिळावी, यासाठी ही बंदी घालण्यात आली.
२. चित्रपटातून मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मांचा अवमान झाल्यास त्या चित्रपटावर तात्काळ बंदी आणली जाते. हिंदूंविषयी मात्र चालढकलपणा करण्यात येतो. जोपर्यंत हिंदु धर्माचा सन्मान होणार नाही, तोपर्यंत प्रजासत्ताकदिन आम्ही मानणार नाही.
३. वेळ पडल्यास आम्ही सीमेवरील क्षत्रिय समाजाच्या सैनिकांना परत येण्याचे आवाहन करू. धर्माचा अपमान पहाण्यासाठी आम्ही सीमेवर हुतात्मा होत नाही.
४. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी क्रांतीकारकांनी बलीदान दिले आहे, ते आपण व्यर्थ दवडणार का ? हिंदु धर्माचा अवमान होत असेल, तर आम्ही ते सहन करणार नाही.
५. ठाणे येथे ‘पद्मावत’ चित्रपटाच्या विरोधात होणार्या महाआंदोलनात मोठ्या प्रमाणात क्षत्रिय समाज सहभागी होणार आहे.
अंबानी यांचा पैसा गुंतलेला असल्यामुळे महाराष्ट्रात अद्याप बंदी नाही !
‘पद्मावत’ चित्रपटासाठी अंबानी यांनी पैसा गुंतवला आहे. अंबानी यांचा जावई प्रशासक आहे. त्याचे आणि मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध असल्यामुळे अद्याप महाराष्ट्रात ‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालण्यात आलेली नाही. शासन अंबानी यांच्या दबावाखाली आहे.
…तर मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार
हिंदूंच्या भावनांचा आदर ठेवून महाराष्ट्रात ‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली नाही, तर आम्ही मुख्यमंत्र्यांना घेराव घालू, अशी चेतावणीही सेंगर यांनी दिली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात