वाराणसी : अनियंत्रित आणि वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील उपलब्ध साधन-सुविदा, विकास दर, तसेच आर्थिक परिस्थिती यांवर गंभीर परिणाम होत आहेत. हे टाळण्यासाठी सर्व नागरिकांसाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने अपर जिल्हाधिकारी वीरेंद्र पाण्डेय यांना येथे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी इंडिया विथ विजडम ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, जिल्हाध्यक्ष अधिवक्ता अवनीश राय, अधिवक्ता मनीष राय, अधिवक्ता अनूप कुमार, अधिवक्ता विनोद कुमार पटेल, अधिवक्ता नवेन्द्र मिश्रा, विश्व हिंदु महासंघाचे शिवपूर मंडलाध्यक्ष श्री. शुभम मिश्रा, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. आकाश पाण्डेय उपस्थित होते.
हिंदूंच्या यात्रांच्या वेळी करण्यात येणारी रेल्वे आणि बस यांच्या तिकीटांवरील दरवाढ तात्काळ रहित करा !
प्रयाग, उत्तरकाशी, हरिद्वार, पुष्करालू (तेलंगण) आदी विविध पवित्र तीर्थक्षेत्रस्थळी होणार्या माघ मेळ्याच्या कालावधीत रेल्वे आणि संबंधित राज्य परिवहन महामंडळ यांच्या वतीने भाडेवाढ केली जाते. केवळ हिंदूंच्या धार्मिक उत्सवांच्या वेळी केली जाणारी भाडेवाढ अन्यायकारक आहे. ती तात्काळ रहित करावी, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी सरकारकडे केली.
निवेदनात करण्यात आलेल्या इतर मागण्या
१. २७ वर्षांपासून विस्थापित काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन झालेले नाही. त्यांना काश्मीरमध्ये स्वतंत्र वसाहत देऊन त्यांचे पुनर्वसन करावे.
२. बिहारमध्ये अल्पसंख्यांकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी १ ते ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ५ टक्के व्याजाने देण्याची योजना आखली आहे. यासाठी १०० कोटी रुपयांची व्यवस्थाही केली आहे. सरकारला विविध माध्यमांतून मिळणारा कररूपी पैसा हा हिंदूंचाच असतो. तरीही त्याचा मुसलमानांना लाभ देणे, हा हिंदूंवर अन्याय आहे. हे घटनेच्या विरुद्ध आहे. यासाठी योजनाच रहित करावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात