इतिहासाचे विकृतीकरण करणार्या चित्रपटाच्या विरोधाला पाठिंबा देणार्या आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांचे अभिनंदन !
दोन गाणी वगळण्याच्या मागणीवर ठाम
नागपूर : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित केलेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातील दोन गाण्याविषयी महाराष्ट्र विधानमंडळातील काही आमदारांनी आक्षेप घेतला आहे. शिवसेनेने या चित्रपटाच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असे म्हटले आहे. बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या विरोधात केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असे भाजप आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.चित्रपटातील दोन गाणी हटवण्यात यावीत, अशी त्यांची मागणी आहे. पुण्यात भाजपचे आंदोलन दिवसभर चालू रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले की, या चित्रपटाला विरोध करणे, ही केवळ स्टंटबाजी आहे. यासाठी आंदोलने करण्यापेक्षा केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे जाणे जास्त योग्य ठरेल. नेमका हा विरोध कशासाठी आहे, ते समजून घेणे आवश्यक आहे. मी स्वतः चित्रपट पहाणार असून इतरांनीही तो बघायला हवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात