चिंबळी (जिल्हा पुणे) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चिंबळी गावातील धर्मशिक्षणवर्गाला येणार्या धर्माभिमान्यांनी पुढाकार घेऊन समितीच्या कार्यकर्त्यांसह १५ जानेवारी या दिवशी गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि श्री हनुमान मंदिराची सामूहिक स्वच्छता केली. या वर्गात देवळात योग्य पद्धतीने दर्शन कसे घ्यावे आणि हिंदु धर्मात मंदिरांचे अनन्यसाधारण महत्त्व हा विषय घेण्यात आला होता. या वेळी धर्माभिमानी सर्वश्री केतन बतवल, अजय जाधव, ऋशी बनकर, आकाश अवघडे, तसेच बजरंग दल संयोजक संजय बहिरट यांसह एकूण २६ धर्माभिमानी मोहिमेत सहभागी झाले होते. धर्माभिमानी श्री. शुभम अवघडे यांनी पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. प्रारंभी उपस्थितांनी हनुमानाचा सामूहिक नामजप केला. त्यानंतर स्वच्छता करण्यात आली. मंदिरात असलेल्या श्री हनुमान, श्री विठ्ठल आणि श्री गणपति यांच्या आरतीने मोहिमेचा शेवट झाला. त्यानंतर धर्माभिमान्यांनी घोषणा दिल्या.
ग्रामस्थांचे अभिप्राय !
स्वच्छतेमुळे मंदिरातील वातावरण प्रसन्न !
१. मंदिरात आलेल्या एका ग्रामस्थांनी मोहिमेचे कौतुक करत म्हटले, सामूहिक स्वच्छतेमुळे मंदिर स्वच्छ झाले आहे. मंदिरातील वातावरण प्रसन्न वाटते. तुमची मोहीम चांगली आहे.
२. मंदिराबाहेर बसलेल्या ग्रामस्थांनी समितीची मोहीम अतिशय चांगली आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
३. मंदिरात नैवेद्य अर्पण करण्यासाठी आलेल्या सौ. अनिता पोळ यांनी मोहिमेचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, सर्वांनी सामूहिक स्वच्छता केल्याने चांगले वाटते. यात आणखी तरुणांनी सहभागी व्हायला हवे.
४. मोहिमेत सहभागी झालेल्या धर्माभिमान्यांनीही मंदिरातील वातावरण प्रसन्न वाटत असल्याचे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात