Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील डिसेंबर २०१७ च्या मासातील धर्मप्रसाराचे कार्य !

१. पिसवली (कल्याण) येथे शौर्य जागरण कार्यक्रमाचे आयोजन

३.१२.२०१७ या दिवशी कल्याण (पूर्व) येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात शौर्य जागरण कार्यक्रम झाला. हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. आशिष पांडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यांनी कार्यक्रमासाठी व्यासपीठ आणि आसंद्या यांची सिद्धता करणे, अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांना निमंत्रण देणे, सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून कार्यक्रमाचा प्रसार करणे, मान्यवरांना संपर्क करणे, या सेवा पुढाकार घेऊन केल्या. श्री. प्रकाश मानुस्करे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.

या शौर्य जागरण कार्यक्रमात बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषद, स्वराज्य प्रतिष्ठान, शिवछत्रपती प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, हिंदु राष्ट्र सेना या संघटनांचे ९० हून अधिक युवक सहभागी झाले होते. या वेळी समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी शौर्य जागरणाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. उपस्थितांनी कल्याण येथे दोन आणि डोंबिवली येथे एक, असे एकूण तीन स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली. कल्याण आणि डोंबिवली येथे स्वरक्षण प्रशिक्षणवगर्र् चालू करण्यात आला.

२. दत्तजयंतीनिमित्त लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेत धर्मप्रेमींचा सहभाग

दत्तजयंतीनिमित्त कल्याण (प.) येथील चौदरपाडा या गावातील दत्त मंदिराजवळ कल्याण येथील धर्मप्रेमींनी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावले होते. त्यांनी दत्तजयंतीच्या आदल्या दिवशी मंदिरात धर्मशिक्षणाचे फलक लावले.

त्यांनी चौदरपाडा गावात हिंदु धर्मजागृती सभा घेण्याच्या उद्देशाने स्थानिक धर्मप्रेमींशी संपर्क करून सभेचे स्थळ निश्‍चित केले. धर्मप्रेमींनी सेवा करतांना आनंद मिळाला आणि नवीन सेवा शिकायला मिळाली, असे सांगितले.

 ३. हिंदु धर्मजागृती सभा

३ अ. पेण (वडखळ) : १७.१२.२०१७ या दिवशी रायगड जिल्ह्यातील वडखळ (पेण) येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थ प्रसार सेवा, सभेची सिद्धता, निवास व्यवस्था आणि वक्त्यांची व्यवस्था, या सेवेत सहभागी झाले होते.

३ आ. दापोडे (भिवंडी) : २३.१२.२०१७ या दिवशी दापोडे (भिवंडी) येथील महादेवी आई सभागृहात हिंदु धर्मजागृती सभा झाली. वीर तानाजी मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रेमनाथ पाटील यांनी या सभेचे आयोजन आणि प्रसारसेवा यात सहभाग घेतला. भित्तीपत्रके लावणे, सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून प्रसार करणे, या सेवा करण्यात वीर तानाजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. ग्रामस्थांनी या सभेसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले.

३ इ. उत्तरशीव (डोंबिवली) : धर्मप्रेमींनी घरोघरी निमंत्रण देणे, भित्तीपत्रके लावणे, यांसारख्या सेवा उत्स्फूर्तपणे केल्या. त्यांनी सभेसाठी लागणारे सर्व साहित्य गावातून गोळा केले आणि सभास्थळी प्रत्यक्ष सेवाही केली. सभेनंतर सर्व धर्मप्रेमींमध्ये धर्मकार्य करण्यासाठी उत्साह निर्माण झाला. उत्तरशीव गावात महिलांसाठी धर्मशिक्षणवर्ग आणि स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी करण्यात आली.

३ ई. दुर्गानगर (कल्याण) : एकविरा चाळ (दुर्गानगर) येथे धर्मप्रेमींच्या पुढाकाराने हिंदु धर्मजागृती सभा झाली. उपस्थितांनी ४ ठिकाणी हिंदु धर्मजागृती सभा घेण्याची सिद्धता दर्शवली, तसेच काही ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

– श्री. बळवंत पाठक, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, ठाणे आणि रायगड (जानेवारी २०१८)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *