Menu Close

जोतिबा मंदिरात पगारी पुजारी नियुक्त केल्यास महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक राज्यांतील भाविकांचा उद्रेक होईल !

गुरव समाज आणि भाविक यांच्या मेळाव्यात चेतावणी

अशी चेतावणी द्यावी लागणे, हे शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे ! प्रत्येक मंदिरात धर्मशास्त्रानुसार कृती होण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

जोतिबा (जिल्हा कोल्हापूर) : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या मंदिरात पगारी पुजारी नियुक्त करण्याच्या शासनाच्या प्रस्तावित निर्णयास महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांतील भाविकांचा तीव्र विरोध राहील. असा निर्णय झाल्यास भाविकांच्या उद्रेकाचा सामना करावा लागेल, अशी चेतावणी भाविकांनी दिली. जोतिबा डोंगरावरील गुरव समाज आणि भाविक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

शासनाने जोतिबा मंदिरातही पगारी पुजारी नेमण्याच्या ठरावाविषयी निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर हा संयुक्त मेळावा घेण्यात आला. पश्‍चिम महाराष्ट्र  देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित येणार्‍या ३ सहस्र ५०० मंदिरांमध्ये पगारी पुजारी नेमण्याचा शासनाचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. यात जोतिबा मंदिराचाही समावेश करण्यात येणार आहे. यामुळे जोतिबा डोंगरावरील गुरव समाज आणि भाविक यांच्यात अप्रसन्नता आहे. गुरव समाज आणि भाविक यांच्यात ऐतिहासिक काळापासून ऋणानुबंध आहेत. जोतिबाचे पुजारी आणि भाविक हे या तीर्थक्षेत्राचे प्रमुख २ घटक आहेत.

मेळाव्यात भाविकांचे प्रतिनिधी म्हणून बोलतांना कोल्हापूर येथील श्री. जयकुमार शिंदे म्हणाले की, जोतिबा डोंगर येथे पगारी पुजारी नियुक्त केल्यास शासनाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात भाविकांचे आंदोलन छेडू.

श्री. किसन कल्याणकर म्हणाले की, या लढ्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील भाविक सदैव जोतिबा येथील पुजार्‍यांच्या मागे एकनिष्ठपणे उभे रहातील.

या वेळी ग्रामस्थांच्या वतीने श्री. कृष्णात शिंगे, माजी सरपंच श्री. शिवाजीराव सांगळे, श्री. जयवंत शिंदे (गुरुजी), श्री. नवनाथ लादे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *