Menu Close

अंधेरी (मुंबई) येथे ‘इम्रान इलेव्हन’ संघाने शिवरायांच्या पुतळ्याचे शीर तोडले !

हिंदूंनो, धर्मांधांची विकृत आणि हिंदुद्वेषी मानसिकता जाणा !

पोलिसांचा हिंदूंवरच लाठीमार !

मुंबई – वर्सोवा, अंधेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित क्रिकेट स्पर्धेत जिंकलेल्या ‘इम्रान इलेव्हन’ या संघाने पारितोषिक स्वरूपात मिळालेल्या छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्याचे शीर तोडून तो पुतळा शौचालयाजवळ ठेवला. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांचा घोर अवमान झाल्याचे कळताच ५०० हून अधिक हिंदू एकत्र आले आणि त्यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. त्या वेळी पोलिसांनी हिंदूंवरच लाठीमार केला. (धर्मांधांकडून सर्वत्र मार खाणारे पोलीस मात्र निरपराध हिंदूंवर अत्याचार करतात ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी केल्यास चूक ते काय ? – संपादक)

‘द ग्रेट मराठा मित्र मंडळा’ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत या संघाला जिंकल्याविषयी ३० सहस्र रोख रक्कमही देण्यात आली होती. पोलिसांनी आयोजकांपैैकी दोघांना आणि इम्रान इलेव्हनच्या संघातील खेळाडूंना कह्यात घेतले अन् रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवले. ही घटना अधिक लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने फेसबूकची पोस्ट टाकलेल्या दोघांची पोलिसांनी एक घंटा चौकशी करून मानसिक छळ केला; मात्र पोलिसांनी वरील प्रकरणी कोणतीही कारवाही न केल्याने हिंदूंमध्ये तीव्र संताप आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *