Menu Close

हाफिज सईदच्या विरोधात खटला चालवा ! – अमेरिकेची पाकला समज

भारतीय शासनकर्ते पाकला असा सज्जड दम केव्हा देणार ?  – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नवी देहली : ‘जमाद-उद्-दावा’ या आतंकवादी संघटनेचा म्होरक्या तथा जिहादी आतंकवादी हाफिज सईद हाच मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार असून त्याच्या विरोधात खटला चालवा, अशी सज्जड चेतावणी ट्रम्प सरकारच्या प्रवक्त्या हीथर नॉर्ट यांनी पाकला दिली. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘आम्ही हाफिज सईदकडे एक आतंकवादी म्हणूनच पहातो. वर्ष २००८ मध्ये मुंबईत झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा तो मुख्य सूत्रधार असून या आक्रमणात अनेक अमेरिकी नागरिकही मारले गेले आहेत. त्यामुळे पाकने हाफिजवर खटला भरावा.’’ काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी हाफिजवर कोणतेच गुन्हे नसल्याचे सांगत त्याचा ‘हाफिज साहेब’, असा उल्लेख केला होता. यावरही हीथर यांनी जोरदार आक्षेप घेतला. ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याने संयुक्त राष्ट्र संघाने हाफिजचा ‘मोस्ट वाँटेड’ आतंकवाद्यांच्या सूचीत समावेश केला आहे.

‘हाफिज सईद याच्या विरोधात पुष्कळ पुरावे आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे’, असे सांगत अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांचे पितळ उघडे पाडलेे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *