स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त चेन्नई येथे कार्यक्रम
चेन्नई : ‘स्वामी विवेकानंद यांची शिकवण आचरणात आणणे आवश्यक आहे. गौरवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेल्या भारत देशात जन्माला येणे, हे आमचे भाग्य आहे’, असे उद्गार पुणे येथील सिद्धाश्रम मठाचे प्रमुख संत शिओकांत यांनी काढले. स्वामी विवेकानंद यांच्या १५५ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
धर्मपालन करणारे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्तेच हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार करू शकतात ! – सौ. सुगंधी जयकुमार, हिंदु जनजागृती समिती
सौ. सुगंधी जयकुमार यांनी स्वामी विवेकानंद यांचे उदाहरण देऊन हिंदु राष्ट्राचे महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या, ‘‘धर्मशिक्षण घेऊन धर्मपालन करणारे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्तेच हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार करू शकतात. यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठांनी संघटित होऊन हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात धर्मजागृती करणे आवश्यक आहे. यामुळेच खर्या अर्थाने पालट होईल.’’
या प्रसंगी शिवसेनेचे श्री. राधाकृष्णन्, भारत हिंदु मुन्नानीचे आर्.डी. प्रभु, अखिल भारत हिंदु सत्य सेनेचे श्री. रामभूपती, हिंदु मक्कल मुन्नानीचे श्री. व्ही.जी. नारायणन्, दक्षिण भारत हिंदु महासभेचे श्री. माणिकांदन, तसेच श्री. प्रभाकरन् हे मान्यवर उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात