चिल्हे (कोलाड) : आज सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांना न्याय, तर हिंदूंवर अन्याय केला जात आहे. लोकशाहीने चालणार्या देशात जनतेला रस्ते, पाणी, शेतकर्यांच्या समस्या यांसाठी आंदोलने करावी लागतात. सामान्य जनतेची फसवणूक होऊन तिला अन्यायकारक वागणूक मिळत आहे, हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे आधुनिक वैद्य उदय धुरी यांनी कोलाड येथील हिंदु धर्मजागृती मेळाव्यात केले. सनातन संस्थेच्या सौ. नंदिनी सुर्वे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सहकार्य
कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य करणारे धर्मप्रेमी सर्वश्री प्रवीण शिंदे, दत्तात्रेय घुने, विजय पाटील चंद्रकांत लोखंडे, विलास सानप, विकी यादव, अजय लोखंडे, हरिभाऊ मोरे, दीपक खराडे, मारुति लोखंडे आणि कोलाड आंबेवाडी ग्रामस्थ अन् कालिदास डेकोरेटर्स यांनी सहकार्य केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात