Menu Close

कराड (जिल्हा सातारा) येथील लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेस पोलिसांनी अनुमती नाकारली !

पदयात्रेस अकारण विरोध करणार्‍यांची चौकशी करण्यात यावी ! – श्री. विनायक पावसकर, पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक, हिंदू एकता आंदोलन

कराड (जिल्हा सातारा) : इतरत्र घडलेल्या दंग्यांचे कारण सांगून लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेस अनुमती नाकारली जात आहे. लव्ह जिहाद हा विषय कोणत्याही जातीशी संबंधित नाही. पदयात्रेच्या माध्यमातून माता-भगिनींमध्ये, तसेच घराघरांत जनजागृती करण्यात येणार होती. माता-भगिनींमध्ये जनजागृती करणार्‍या या पदयात्रेला विरोध का केला गेला, याची तसेच पदयात्रेस अकारण विरोध करणार्‍यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. विनायक पावसकर यांनी पत्रकार परिषदेत केली. येथे हिंदू एकता आंदोलनच्या वतीने कराड ते सातारा या मार्गे काढण्यात येणार्‍या ‘लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रे’स पोलिसांनी अनुमती नाकारली, याविषयी श्रीकृष्ण भवन, पावसकर गल्ली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘कोरेगाव भीमा येथे घडलेल्या प्रकारानंतर तणाव निर्माण झाला आहे. या पाश्‍वभूमीवर जिल्ह्यातील सलोखा कायम रहावा’, असे कारण देत पोलिसांनी पदयात्रेस अनुमती नाकारली.

या वेळी हिंदू एकता आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत जिरंगे, श्री. विक्रम पावसकर, कार्याध्यक्ष श्री. राहुल यादव, जिल्हा उपाध्यक्ष श्री. रूपेश मुळे, श्री. गणेश महामुनी, श्री. प्रकाश जाधव आणि गोरक्षक महेश जाधव उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील युवती मोठ्या प्रमाणात ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रास बळी पडल्याचे आकडेवारीतून स्पष्ट दिसते. या संकटाचे गांभीर्य ओळखून जनजागृती करण्यासाठी २० आणि २१ जानेवारीला हिंदू एकता आंदोलनच्या वतीने पदयात्रा आणि सभा यांचे आयोजन करण्यात आले होते.

श्री. विनायकराव पावसकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेली सूत्रे

१. लव्ह जिहाद अस्तित्वात असल्याचे केरळ उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

२. पाकिस्तान आणि बांगलादेश येथील धर्मांध भारतातील स्थानिक अन्य धर्मातील जात्यंध लोकांना हाताशी धरून हिंदु धर्मावर आक्रमणे करत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून हिंदु धर्मातील युवती आणि स्त्रिया यांना फसवून प्रेमपाशात अडकवले जाते, तसेच त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केले जाते. ही पदयात्रा पाकिस्तान आणि बांगलादेशी यांंनी चालवलेल्या जिहादी प्रवृत्तीच्या विरोधात आहे.

३. जिल्ह्यात घडलेल्या लव्ह जिहादच्या घटनांचा तपशील आमच्याकडे आहे. जर या युवती लव्ह जिहादच्या शिकार झाल्या नसतील, तर त्या कोठे आहेत, जिवंत आहेत का, याचा पोलीस प्रशासनाने खुलासा करावा.

४. पदयात्रेचे नियोजन ३ मासांपूर्वीच झाले होते. त्याची रंगीत तालीमही झाली होती, याची प्रशासनास पूर्ण कल्पना होती. तरीही ऐनवेळी अनुमती नाकारल्याने हिंदुत्वनिष्ठांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.

पदयात्रेस अनुमती मिळावी यासाठी हिंदू एकता आंदोलनाचे लाक्षणिक उपोषण !

पदयात्रेसाठी प्रशासनाने अनुमती द्यावी, यासाठी २० जानेवारीला दत्त चौक, कराड येथे हिंदू एकता आंदोलनच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. लोकशाहीमध्ये लव्ह जिहादसारख्या अन्यायाविरोधात निषेध करणे, आवाज उठवणे, हा सर्वांचा अधिकार आहे. त्यामुळे पदयात्रेस अनुमती मिळावी, ही मागणी आग्रहीपणे मांडणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.

लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेस पुरोगामी, मुस्लिम संघटनांसह अंनिसचाही विरोध !

अंनिसचा हिंदुविरोधी चेहरा पुन्हा उघड ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पदयात्रेतून चुकीची माहिती देऊन विषारी प्रचार केला जात आहे. अशा कार्यक्रमास अनुमती देण्यात येऊ नये, असे निवेदन परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीचे तौसिफ शेख, मुस्लिम जागृती अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जामिया उलेमा ए हिंद आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांसह अन्य काही संघटनांनी १८ जानेवारीला पोलीस अधीक्षकांना दिले.

‘व्ही.एम्. न्यूज’ या स्थानिक वृत्तवाहिनीकडून पदयात्रेविषयी अपप्रचार !

जातीधर्मात फूट पाडण्याचे कारस्थान हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून केले जात आहे. भाजप आणि हिंदू एकता आंदोलन यांनी ‘लव्ह जिहाद’ या विस्फोटक विषयास हात घालून एका समाजाला लक्ष्य करत आहेत, असे वृत्त येथील ‘व्ही.एम्. न्यूज’ या वाहिनीवर प्रसारित करण्यात आले. या वाहिनीवरून काही मासांपूर्वी क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या जयंतीचे उदात्तीकरण करणारे वृत्त प्रसारित करण्यात आल्याचे हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले.

पुरोगामी आणि धर्मांध/मुस्लिम संघटनांनी या वाहिनीवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया

मुस्लिम समाजाच्या महिला प्रतिनिधी : जिहादच्या नावाखाली मुली बळी पडल्याची सातार्‍यात आजवर एकही घटना घडलेली नाही. मुलींना १८ वर्षानंतर व्यक्तीस्वातंत्र्य मिळते. अशा पदयात्रांना मुस्लिम समाज थारा देणार नाही.

फारूखभाई पटनी, अध्यक्ष, मुस्लिम अल्पसंख्यांक आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया : लव्ह जिहाद निषेध यात्रेस अनुमती देऊ नये. जातीजातीत फूट पाडणार्‍यांना वेळ पडल्यास झोडपून काढणार. लोकांच्या संयमाचा बांध फुटल्यास सातार्‍यात कहर होईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *