प्रत्येक वेळी हिंदुत्वनिष्ठांचाच आवाज दडपणार्या अशा पोलिसांची तक्रार त्यांचा वरिष्ठांकडे करा आणि त्याची माहिती पोलिसांच्या नावांसह सनातन प्रभातला कळवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ठाणे : ‘पद्मावत’ चित्रपटात राणी पद्मावती यांची प्रतिमा मलीन करण्यात आल्याने राजपूत करणी सेनेसह विविध संघटनांनी या चित्रपटाला प्रथमपासूनच तीव्र विरोध दर्शवला आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन करू नये, यासाठी येथे कोरम मॉल ते व्हिव्हियाना मॉल अशी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निषेधफेरी काढण्यात येणार होती; मात्र नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना फौजदारी दंडप्रक्रिया संहिता कलम १४९ नुसार नोटीस बजावत वागळे इस्टेट पोलिसांनी अनुमती नाकारली. निषेधफेरीला पोलिसांनी अनुमती नाकारल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी कोरम मॉल, व्हिव्हियाना मॉल येथे असलेल्या चित्रपटगृहांना ‘हिंदूंच्या भावना दुखावणारा चित्रपट दाखवू नये’, अशा आशयाचे निवेदन दिले, तसेच ‘हा चित्रपटच लोकांनी पाहू नये म्हणजे यापुढे असे चित्रपट बनवतांना दिग्दर्शक विचार करतील’, असे आवाहन केले आहे.
निवेदन देण्यासाठी ‘क्षत्रिय समाज ठाणे’चे अध्यक्ष श्री. धनंजय सिंह, अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे श्री. विनय सिंह, गुजराती समाजाचे श्री. वाघेला, रामसेनेचे सुनील सिंह, श्री. नरेश घै आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात