-
२ धर्मांधांना अटक
-
बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या साहाय्याने हिंदु कुटुंबाला घर परत मिळाले !
भारतातील हिंदूंचे रक्षण करू न शकणारे सरकार आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण कसे करणार ? यास्तव आता सर्वत्रच्या हिंदूंनीच संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : बांगलादेशच्या नारायणगंज जिल्ह्यातील सोनारगाव येथे नुकतेच एका हिंदु कुटुंबाला रहात्या घरातून धर्मांधांनी बलपूर्वक बाहेर हाकलले आणि त्यांचे घर अवैधरित्या कह्यात घेतले. पीडित हिंदु कुटुंबियांनी तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करणार्या बांगलादेश मायनॉरिटी वॉचशी संपर्क साधला असता या संघटनेने पोलिसांच्या साहाय्याने या हिंदु कुटुंबाला त्यांचे घर परत मिळवून दिले. घर आणि जमीन अवैधरित्या बळकावणार्या २ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, अब्दुल वहाब, महंमद जमाल, कमरूल इस्लाम, आयेशा बेगम आदी धर्मांध या हिंदु कुटुंबाच्या घरात घुसले आणि घरातील साहित्याची मोडतोड केली, तसेच त्यांचे देवघर उद्ध्वस्त केले. हिंदु कुटुंबप्रमुख श्री. लिटन साहा यांनी सोनारगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या मानवाधिकार पथकाने पीडित हिंदु कुटुंबाची भेट घेऊन स्थिती जाणून घेतली. या पथकाने पोलिसांच्या साहाय्याने हिंदु कुटुंबियांना त्यांचे घर परत मिळवून दिले, तसेच सोनारगाव पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस अधिकार्यांशी चर्चा केली. अल्पसंख्यांक हिंदूंची घरे आणि जमिनी अवैधरित्या बळकावणार्या समाजकंटकांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात