जळगाव : राजपूत समाजबांधवांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे १९ जानेवारीला ‘माँ पद्मावती सन्मान मोर्चा’ला नूतन मराठा महाविद्यालयापासून प्रारंभ झाला. मोर्च्यात जळगावसह पाचोरा, चाळीसगाव, चोपडा येथील राजपूत समाज बांधव आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे, तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी संघटित झाले होते. मोर्च्यात ६ सहस्रांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला.
मोर्च्याला लाभलेली लक्षणीय उपस्थिती
मोर्च्यापूर्वी नूतन मराठा महाविद्यालयातील व्यासपिठावर राणी पद्मावती यांच्या प्रतिमेचे युवतींनी पूजन केले आणि उपस्थित सर्व मोर्चेकर्यांना राणी पद्मावती यांचा इतिहास समजावून सांगितला. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास युवतींनी माल्यार्पण केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांना महिला आणि युवती यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदनात संजय लीला भन्साळीनिर्मित आणि दिग्दर्शित ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
उपस्थित मान्यवर
भाजपचे आमदार श्री. सुरेश (राजू मामा) भोळे, एरंडोलचे माजी आमदार श्री. महेंद्रसिंग पाटील, बेटी बचाव बेटी पढाओ अभियान महाराष्ट्र्र प्रदेशच्या सदस्या सौ. अस्मिता पाटील, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आणि पाचोरा माजी आमदार श्री. आर्.ओ. पाटील, शिवसेनेचे चोपडा येथील आमदार श्री. चंद्रकांत सोनवणे, शिवसेनेचे पाचोरा येथील आमदार श्री. किशोर पाटील, एरंडोलचे माजी आमदार बापूसो महेंद्रसिंग पाटील, क्षत्रिय समाज जिल्हाध्यक्ष श्री. महेंद्रसिंग पाटील, इतिहासकार श्री. रामचंद्र पाटील
हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा : सनातन संस्था, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, शिवसेना, हिंदु जनजागृती समिती
श्री. जयकुमार रावल, पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य : ‘पद्मावत’ चित्रपट म्हणजे भारताच्या प्रेरणादायी इतिहासात केलेली ढवळाढवळ !
तात्यासाहेब आर्.ओ.पाटील, माजी आमदार, पाचोरा : चित्रपटाचे नाव किंवा चित्रीकरणाला कट लावणे म्हणजे संघर्षाची धार बोथट होईल आणि सारे शांत होईल, असे समजणे चुकीचे आहे. इतिहासाचे दाखले अवश्य द्यावेत; पण ते वस्तुनिष्ठ असावेत. पैशांसाठी चुकीचा इतिहास दाखवणे निर्मात्यांना महागात पडेल.
बापूसाो महेंद्रसिंग पाटील, माजी आमदार, एरंडोल : पैशासाठी स्त्रीचे विकृत दर्शन घडवणार्या प्रवृत्तींचा समाजाने निषेध केला पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात