सोलापूर : येथे ७ फेब्रुवारी २०१८ या दिवशी अक्कलकोट रोड, पुंजाल क्रीडांगण येथे जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या प्रसारानिमित्त आसपासच्या विविध गावांमध्ये धर्मप्रेमींनी छोट्या हिंदु धर्मजागृती सभांचे आयोजन केले होते. या सभांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
१. होनसळ : येथील दुर्गादेवी मंदिरात १४ जानेवारी या दिवशी धर्मजागृती सभा पार पडली. सभेचा प्रारंभ श्री दुर्गादेवीची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्या पूजनाने करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये आणि जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी २५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. धनाजी वानकर यांनी सभेचे आयोजन करण्यास विशेष प्रयत्न केले. या वेळी सर्व धर्मप्रेमींनी होनसळ येथून २ गाड्या ठरवून सभेला उपस्थित रहाण्याचे निश्चित केले. येथे द्राक्ष बागायतदार तानाजी पवार यांनी २ टेम्पो घेऊन सभेला उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले.
२. गंगेवाडी : येथे १५ जानेवारी या दिवशी येथील महादेव मंदिरात हिंदुत्वनिष्ठ श्री. शिवाजी पाटील आणि सौ. ज्योती जाधव यांनी सभेचे आयोजन केले होते. या वेळी १०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. गावातील धर्मप्रेमींनी सभेला २ वाहने घेऊन उपस्थित रहाणार, तसेच आसपाच्या गावांमध्ये सभेचा प्रचार करणार, असे सांगितले. ‘हिंदु धर्माविषयी आम्हाला अमूल्य माहिती लाभली’, असे काहींनी सांगितले. बचत गटाच्या अध्यक्षा ज्योती जाधव यांनी १५० महिलांना एकत्र केले.
३. नरुटेवाडी : येथे १९ जानेवारी या दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे सभा पार पडली. या वेळी ३०० धर्मप्रेमी उपस्थित होते. येथील सभेला आसपासच्या वडगाव, वाडी आणि तामलवाडी या ३ गावांतून धर्मप्रेमी स्वत:चे वाहन घेऊन उपस्थित राहिले. सभा झाल्यावर धर्मप्रेमींनी सांगितले की, धर्मकार्यासाठी आम्हाला केव्हाही बोलवा, आम्ही येऊ.
या वेळी प्रोजेक्टरद्वारे भाजपचे आमदार टी. राजासिंह यांचे सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन करणारे चलचित्र दाखवण्यात आले. ते पाहून येथील धर्मप्रेमींचा उत्साह द्विगुणीत होऊन सोलापूर येथील सभेला उपस्थित रहाण्याचे सर्वांनी आश्वासन दिले.
श्री. रामचंद्र मोरे यांनी येथे सभा आयोजित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांचा फेटे घालून सत्कार केला. पाटील जाधव यांनी सभेला येण्यासाठी वाहन निश्चित केले. वडगाव येथील विश्वजीत (बंटी) चुंगे यांनी आसपासच्या गावांतून युवकांना एकत्र करून ते सभेला आले होते. ही सभा पाहून अन्य गावातून आलेल्या युवकांनी सभेची मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात