नांदेड : येथे हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत कार्य करणार्या व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी यांच्या बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या बैठकीला संबोधित करतांना हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, हिंदु जनजागृती समिती समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, हिंदूसंघटन, हिंदु राष्ट्राची स्थापना या पंचसूत्राच्या आधारे कार्य करते. ईश्वरी अधिष्ठान ठेवून कार्य केल्याने समितीच्या कार्याला अल्पावधीत मोठे यश मिळत आहे. आज नांदेड सारख्या ठिकाणी अहिंदूंची वाढती लोकसंख्या, लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु मुलींचे होणारे धर्मांतर, तसेच नांदेड येथील स्थानिक समस्यांचा विचार करता झालेली संवेदनशील स्थिती आणि दंगलीच्या वेळी व्यापार्यांना सोसावी लागणारी हानी यांना सामोरे जाण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हाच एकमेव उपाय आहे.’’
मार्गदर्शनानंतर अनेकांनी शंकानिरसन करून घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली.
क्षणचित्र
व्यापार्यांनी प्रत्येकी १५ दिवसांतून एकत्र येऊन बैठक घेऊन धर्मकार्यास प्रारंभ करणार असल्याचे सांगितले. दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार होण्याचीही सिद्धता दर्शवली.
उपस्थित व्यापारी
सर्वश्री कैलास शर्मा, संजय शर्मा, अधिवक्ता राजेश ओझा, राजेश भाऊ शर्मा, गणेश मंत्री, लक्ष्मीनारायण शर्मा, कांतीलाल शर्मा, जयप्रकाश ओझर, उत्तम चक्रवार, गणेश मारकर
नांदेड येथील अधिवक्त्यांचा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान देण्याचा निर्धार
नांदेड : येथील न्यायालयाच्या अभिवक्ता संघाच्या सभागृहात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला २१ अधिवक्ते उपस्थित होते. बैठकीनंतर सर्व अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान देणार असल्याचे सांगितले.
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यलढ्यातही भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अधिवक्त्यांंचा अधिक सहभाग होता. सध्या भारतात लव्ह जिहाद, हिंदूंच्या मंदिरातील पैशांंचे घोटाळे, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली काही नास्तिकवादी संघटनांनी हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळणे, मंदिर सरकारीकरण, मंदिरांतील भ्रष्टाचार अशी सर्वत्र स्थिती आहे. ही स्थिती पालटण्यासाठी आज हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. त्यासाठी अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.’’
या वेळी त्यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून केलेल्या याचिका आणि त्यातून मिळालेले यश याविषयी सविस्तर माहिती दिली.
बैठकीत नांदेड बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. मिलिंद ऐकताटे, तसेच उपाध्यक्ष जगजीवन तुकाराम भेदे उपस्थित होते. बैठकीची प्रस्तावना अधिवक्ता जगदीश हाके यांनी केली.
उपस्थित अधिवक्ते
शंकरसिह ठाकुर, जगजीवन भेदे, जि.व्ही.भाले, जगन दर्शणे, राजेश नाईक, दीपक बिराजदार, रमेश धात्रक, के. आर्. विडुळे, प्रकाश ठाणेकर, अक्षय वट्टमवार, प्रांजेश फटाले, व्ही.डी. पाटणुरकर, रंजित नायर, बालाजी कवळे, चंद्रकांत पत्की, महेश देशपांडे
क्षणचित्रे
१. अधिवक्ते जगदीश हाके, शंकरसिंह ठाकूर आणि रमेश धात्रक, तसेच त्यांचे सहकारी यांनी अल्पावधीत पुढाकार घेऊन बैठकीचे आयोजन केले.
२. बैठकीनंतर काही अधिवक्त्यांंनी उत्स्फूर्तपणे कार्यात सहभागी होणे आणि स्वतःचे योगदान देणे यांविषयी श्री. घनवट यांच्याशी चर्चा केली.
३. अभिवक्ता संघाच्या मालकांनी सभागृह तात्काळ विनामूल्य उपलब्ध करून दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात