पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते द्वैपायन वरखेडकर यांची राष्ट्रपतींना विनंतीपत्राद्वारे मागणी
अशी मागणी का करावी लागते ? शासनकर्ते जनभावनांची नोंद का घेत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पंढरपूर : पद्मावत हा चित्रपट २५ जानेवारी या दिवशी प्रदर्शित होत आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयाने एकाच बाजूने निकाल दिला आहे, असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. द्वैपायन वें. वरखेडकर यांनी मांडले. याविषयी वरखेडकर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना विनंतीपत्र पाठवले आहे.
यानंतर वरखेडकर यांनी पद्मावत हा चित्रपट पंढरपूर येथे प्रदर्शित करू नये, यासाठी येथील चित्रपटगृह डी.व्ही.पी. क्वेअर (मल्टीप्लेक्स सिनेमागृह), पोलीस निरीक्षक आणि पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांना लेखी पत्राद्वारे विनंती केली.
राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात श्री. वरखेडकर यांनी म्हटले आहे की,
१. पद्मावत हा चित्रपट इतिहासाची मोडतोड करणारा आहे. तो प्रदर्शित झाल्यास लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. त्यामुळे देशात विनाकारण विद्वेश आणि अशांतता पसरेल.
२. चित्रपट हा केवळ मनोरंजनाचे साधन आहे. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांना अधिकार नाही. या कारणांमुळे या चित्रपटावर बंदी आणावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात