भिवंडी (ठाणे जिल्हा) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे स्मरण करून शौर्य जागृत करण्यासाठी ऐतिहासिक शहर मानले जाणार्या भिवंडी शहरात २८ जानेवारी २०१८ या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेचा दिवस जवळ येऊ लागला आहे, तसे शहर आणि ग्रामीण भागात सभेच्या प्रसाराचा वेग वाढू लागला आहे. अनेक धर्माभिमानी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, मंडळ यांनी सभा यशस्वी करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
१. अनेक गावांमध्ये छोट्या-मोठ्या बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बैठकांना १०० पेक्षा अधिक उपस्थिती लाभत आहे. मुले आपापल्या गावात भित्तीपत्रकेही लावत आहेत.
२. काही गावांमध्ये हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमातून सभेचा विषय मांडण्यात येत आहे. महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
३. संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत सर्व गावातील महिला भाकर्या भाजत असतात. इतर वेळी कुठेही गेले, तरी भाकर्या भाजण्याच्या वेळी परत येतात; पण सभेच्या दिवशी मात्र आम्ही एक दिवस भाकर्या लवकर भाजून सभेला येऊ, असे महिलांनी सांगितले.
धर्मांधबहुल भिवंडीत हिंदु धर्मजागृती सभा होणे चांगले ! – पत्रकार
पत्रकार भेटीत एका पत्रकाराने भिवंडीमध्ये धर्मांधांची संख्या वाढत आहेत. हिंदूंनी भिवंडीमध्ये संघटित होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु धर्मजागृती सभा होत आहे, हे पुष्कळ चांगले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात