Menu Close

कराड येथे ‘लव्ह जिहाद निषेध जनजागृती पदयात्रे’ला अनुमती मिळण्यासाठी ‘हिंदू एकता आंदोलन’च्या कार्यकर्त्यांचे लाक्षणिक उपोषण

पोलीस उपअधीक्षकांनी पदयात्रेस अनुमती देण्याचे पत्र दिल्यानंतर उपोषण स्थगित

  • हिंदूबहुल देशात हिंदूंवरील आघातांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी वैध मार्गाने आंदोलन करण्यास अनुमती नाकारायला हा पाक आहे का ?
  • हिंदूंनो, ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

कराड (जिल्हा सातारा) : ‘लव्ह जिहाद निषेध जनजागृती पदयात्रे’स अनुमती मिळावी, यासाठी हिंदू एकता आंदोलनच्या वतीने २० जानेवारीला दत्त चौक येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. २० आणि २१ जानेवारीला हिंदू एकता आंदोलनच्या वतीने आयोजित केलेल्या पदयात्रेस कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचे कारण देऊन पोलिसांनी अनुमती नाकारली होती. याच्या निषेधार्थ आणि पदयात्रेस अनुमती देण्यात यावी, या मागणीसाठी शेकडो कार्यकर्त्यांनी उपोषण केले.

दत्त चौक, कराड येथे लाक्षणिक उपोषण करतांना हिंदुत्वनिष्ठ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून आणि ध्येयमंत्र म्हणून आंदोलनास प्रारंभ झाला. भगव्या टोप्या परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी या वेळी राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. वाई (जिल्हा सातारा) येथेही याच मागणीसाठी उपोषण करण्यात आले. या वेळी पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली. तसेच ‘नजीकच्या काळात पदयात्रेस अनुमती देण्यात येईल’, असे पत्र दिले. (प्रत्येक वेळी हिंदूंना आंदोलन किंवा उपोषण करण्यास भाग पाडणारे पोलीस आणि प्रशासन काय कामाचे, असा प्रश्‍न हिंदूंना पडल्यास चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याविषयी हिंदू एकता आंदोलनचे संस्थापक-अध्यक्ष श्री. चंद्रकांत जिरंगे यांनी ही माहिती दिल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

पदयात्रेस नजीकच्या काळात अनुमती न दिल्यास प्रत्येक गावात आंदोलन करणार ! – विनायक पावसकर, हिंदू एकता आंदोलन

लव्ह जिहादच्या षड्यंत्रात अडकवून अनेक हिंदु युवतींचे धर्मांतर केले जात आहे. याविषयी जागृती करणे, हे आम्ही कर्तव्य मानतो. अन्य ठिकाणी घडलेल्या घटनांचा बाऊ करून पदयात्रेस अनुमती नाकारणे म्हणजे लोकशाहीने आम्हाला दिलेल्या अधिकारांचे हननच आहे. ‘लव्ह जिहाद अस्तित्वात नाही’, असे सांगून पदयात्रेस विरोध करणार्‍यांनी चर्चेला यावे. लव्ह जिहाद घडल्याचे १०० पेक्षा अधिक पुरावे देऊ. पदयात्रेस नजीकच्या काळात अनुमती न दिल्यास या विरोधात प्रत्येक गावात आणि प्रत्येक वाडीवस्तीवर आंदोलन करण्यात येईल !

माताभगिनींवर अकारण वाईट दृष्टी ठेवणार्‍यांना सहन करणार नाही ! – स्वामी बलरामदास, हिमाचल प्रदेश

हिंदू कधी इतरांना उपद्रव करत नाही. ही भूमी प्रभु श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या शूरवीरांची आहे. आमच्या माताभगिनींवर अकारण वाईट दृष्टी ठेवणार्‍यांना आम्ही सहन करणार नाही.

हिंदूंमध्ये जागृती करण्याचे व्रत घेतलेल्या दैनिक सनातन प्रभातच्या कार्याची पोचपावती !

दैनिक सनातन प्रभात अनेक वर्षांपासून लव्ह जिहादविषयी हिंदू समाजात जागृती करत आहे. या प्रेरणेने हेच जागृतीचे कार्य जिल्ह्यातील जनसामान्यांमध्ये जावे, म्हणून हिंदू एकता आंदोलन कार्य करत आहे.

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पदाधिकारी

हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर, कार्याध्यक्ष श्री. राहुल यादव, जिल्हा उपाध्यक्ष श्री. रुपेश मुळे, जिल्हा समन्वयक श्री. अजय पावसकर, हिमाचल प्रदेश येथील स्वामी बलरामदास, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, श्री. मदन सावंत, भाजपचे नगरसेवक श्री. सुहास जगताप, श्री. सुनील कोळेकर, गोवृक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. महेश कदम, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. रवींद्र डोंबे, अमोल मोरे आणि सनातन संस्थेचे श्री. लक्ष्मण पवार

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *