-
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
-
प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी पुजारी न्यायालयात
तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्त समितीच्या ३१ ऑक्टोबर २०१७ च्या बैठकीतील ठरावानुसार श्री तुळजाभवानी मंदिरातील श्री खंडोबा देवस्थान आणि श्री भवानी शंकर देवस्थान यांना देवाच्या नंदादीपातील तेल आणि देवापुढे दान स्वरूपात येणारी रक्कम अन् वस्तू घेण्यास बंदी करण्यात आली असून दोन्ही ठिकाणी मंदिर प्रशासनाची दानपेटी ठेवण्यात आली आहे, तसेच तेथे समितीचा कर्मचारी बसवण्यात आला आहे.
देवीचा चांदीचा पलंग आणि नरसिंह मंदिर यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मंदिर संस्थान तेथे दानपेट्या ठेवू शकले नाही. या निर्णयाला विरोध करण्यासाठी संबंधित पुजार्यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात