Menu Close

राष्ट्रउभारणी आणि राष्ट्ररक्षण यांसाठी शालेय अभ्यासक्रमात मराठ्यांंचा जाज्वल्य इतिहास समाविष्ट करा ! – पू. भिडेगुरुजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मागणी करणार

पू. संभाजी भिडेगुरुजी

खंडाळा (जिल्हा सातारा) : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे भारतमातेचे प्राण आहेत. छत्रपती शिवरायांनी कसे जगावे याचा, तर छत्रपती संभाजीराजांनी धर्मासाठी कसे मरावे, याचा मंत्र दिला. त्यांच्या इतिहासातून राष्ट्रभक्तीचे धडे मिळतात. राष्ट्रउभारणी आणि राष्ट्ररक्षण यांसाठी मराठ्यांंचा हा जाज्वल्य इतिहास देशभरात इयत्ता पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. याविषयीची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. ते श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या प्रतापगड ते रायरेश्‍वर गडकोट मोहिमेविषयी मार्गदर्शन करतांना बोलत होते. या वेळी राज्यभरातून आलेले सहस्रो धारकरी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, आजच्या युवकांना इतिहासात दडलेले राष्ट्रभक्तीचे धडे मिळाले पाहिजेत. त्यातूनच सक्षम पिढी सिद्ध होईल. अशी पिढी घडवण्यासाठी गडकोट मोहिमांचे आयोजन केले जाते. या मोहिमेअंतर्गत किल्ले रायरेश्‍वर येथे पुन्हा एकदा स्वराज्य उभारणीची शपथ घेतली जाणार आहे. तरी महाराष्ट्रातील धारकरी आणि शिवभक्त यांनी मोठ्या संख्येने मोहिमेत सहभागी व्हावे.

क्षणचित्र

खंडाळा तालुक्यातील बावडा ग्रामस्थांच्या वतीने किल्ले रायगडावर सुवर्ण सिंहासनाच्या प्रतिष्ठापनेसाठी एक लक्ष रुपये निधी देणार असल्याची घोषणा करण्यात आली.

किल्ले प्रतापगड ते रायरेश्‍वर धारातीर्थ यात्रा मोहीम !

प्रारंभ : किल्ले प्रतापगड येथून शुक्रवार, २६ जानेवारी २०१८, दुपारी १ वाजता

समारोप : किल्ले रायरेश्‍वर येथे मंगळवार, ३० जानेवारी २०१८

अधिक माहितीसाठी संपर्क : ९८६०८५७८०९, ९८२२९१०४६०

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *