राळेरास (जिल्हा सोलापूर) : हिंदूंवरील आघातांविषयी समाजाला माहिती व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम यांची ज्योत प्रज्वलित होऊन हिंदूसंघटन व्हावे, या उद्देशाने येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. गणेश नागोडे यांनी गावकर्यांना एकत्र करून हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी उपस्थितांना हिंदु धर्मावर होणारे विविध आघात या विषयी माहिती देऊन ते रोखण्यासाठी सोलापूर येथे ७ फेब्रुवारी या दिवशी अक्कलकोट रोड, पुंजाल क्रीडांगण येथे होणार्या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावा, असे आवाहन केले. सभेचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला. त्यानंतर सरपंच श्री. महेश माने यांनी श्री. खाडये यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. सभेचे सूत्रसंचालन गावातील शिक्षक श्री. कमलाकर जाधव यांनी केले.
या वेळी १५० गावकरी उपस्थित होते. गावकर्यांनी सोलापूर येथे होणार्या धर्मजागृती सभेला उपस्थित रहाणार असल्याचे उत्स्फूर्तपणे सांगितले. सभेनंतर श्री. मनोज खाडये यांनी येथील सरपंच श्री. महेश माने यांना भगवा झेंडा आणि श्रीफळ देऊन सभेचे निमंत्रण दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात