Menu Close

भिवंडी येथे भागवत सप्ताहातील २ सहस्र लोकांपर्यंत हिंदु धर्मजागृती सभेचा विषय पोहोचला

वारकरी संप्रदायही समवेत असल्याचे कीर्तनकार ह.भ.प. क्षीरसागर महाराज यांचे प्रतिपादन

भागवत सप्ताहात दिलेले सभेचे निमंत्रणभिवंडी (जिल्हा ठाणे) : ब्रह्मानंद नगर येथील भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमात येथे होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले. या भागवत सप्ताहामध्ये २ सहस्रांहून अधिक भाविक उपस्थित होते. या वेळी सप्ताहातील कीर्तनकार ह.भ.प. क्षीरसागर महाराज यांनी उपस्थितांना सभेला जाण्याचे आवाहन केले. त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक करून वारकरी संप्रदाय तुमच्यासमवेत आहे, असे उद्गार काढले.

ह.भ.प. क्षीरसागर महाराज यांची भेट घेतांना श्री. प्रसाद वडके

वैशिष्ट्यपूर्ण

१. हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यासाठी शिवसेनेचे श्री. भैरव कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

२. सभेचे निमंत्रण दिल्यानंतर भाविकांनी मुख्यतः तरुण मुलांनी पुढाकार घेत भित्तीपत्रके मागवून घेतली अन् ती गावात लावली.

३. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ध्वनीक्षेपकाद्वारे निमंत्रण देण्यात आले.

४. कीर्तनामध्ये आलेले श्री. भाकरे यांनी त्यांच्या गावात सभेचा विषय मांडण्यास येण्याविषयी सांगितले, तसेच यासाठी १ दिवस सुट्टी घेण्याचीही त्यांनी सिद्धता दर्शवली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *