नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
नागपूर : येथे सर्व नागरिकांसाठी समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यांसाठी तातडीने कायदा करावा, तसेच हिंदूंच्याच धार्मिक उत्सवांच्या वेळी करण्यात येणारी अतिरिक्त भाडे ही अन्यायकारक आणि धार्मिक भेदभाव करणारी असल्याने ती तात्काळ रहित करावी, अशा मागण्या येथे झाशी राणी चौकात झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आल्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला आणि श्री. अभिजीत लके, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या सौ. वैशाली परांजपे यांनीही या वेळी मते मांडली.
क्षणचित्र
आंदोलनाच्या आदल्या दिवशी तेथे अन्य संघटनेचे आंदोलन असल्याने तुम्ही अन्य दिवशी आंदोलन करा, असे पोलिसांनी सांगितले. समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले, आम्हालाही त्याच दिवशी आणि त्याच वेळेत आंदोलन करायचे आहे. तुम्ही नियोजन करा. त्यानंतर पोलिसांनी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली. आंदोलन नेहमीपेक्षा जास्त परिणामकारक झाले. प्रसिद्धीमाध्यमांनीही चांगला प्रतिसाद दिला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात