Menu Close

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाकरता वेळोवेळी मांडलेले ज्वलंत विचार !

  • आज असलेल्या हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९२ व्या जयंतीच्या निमित्ताने…

  • मतांची भीडभाड न बाळगता असे परखड आणि व्यवहारनिष्ठ वक्तव्ये करण्याचे धाडस किती नेते दाखवतात ?

  • जातीवर आधारित जनगणना राष्ट्रभंजक !

जातनिहाय जनगणना राष्ट्रभंजक आहे. राष्ट्राची लावलीत तेवढी वाट पुरे ! आता देशवासियांमध्ये आणखी दुफळी निर्माण करू नका. देशातल्या नागरिकांची गणना करणे हा जनगणनेचा उद्देश आहे ना, मग तेथे जात हवीच कशाला ? हे देशासाठी चांगले संकेत नाहीत, उलट त्यामुळे राष्ट्रवासियांमध्ये दुफळीच निर्माण होईल. देशातल्या नागरिकांची जनगणना करायची आहे ना, मग त्यात हवं तर हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती असे वर्गीकरण करा ! म्हणजे आपल्याकडे किती बांगलादेशी मुसलमान आहेत, ते तरी कळेल. – हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे (आज कधी नव्हे इतक्या हिंदूऐक्याची आवश्यकता असतांना बाळासाहेबांचे हे विचार अत्यंत उद्बोधक ठरतात. भारत सरकारने या विचारांची दखल घ्यावी, अशी राष्ट्रप्रेमी हिंदूंची आग्रही मागणी आहे. – संपादक)

भारताला हिंदु राष्ट्र संबोधण्यास प्रारंभ करा !

तुम्हा हिंदूंची कुंभकर्णाला लाजवेल, अशी झोप असून ती उडाली नाही, तर झोपेतच तुमचा मुडदा पडेल. ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचरबाईंनी मुसलमानांचे लाड चालू दिले नाहीत. तसा पंतप्रधान आपल्याला हवा ! भारतात बहुसंख्य हिंदू असतांना हिंदु राष्ट्र घोषित करण्याची अनुमती कशाला मागता ? उद्यापासून हा देश हिंदु राष्ट्र असल्याचे संबोधण्यास प्रारंभ करा.  – हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे

(हिंदूंनो, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या या वक्तव्याचे चिंतन करा नि देशाला हिंदु राष्ट्राच्या सुवर्ण युगाकडे घेऊन जाण्यासाठी आजपासूनच संघटित व्हायला आरंभ करा ! हिंदूसंघटनाद्वारे वैचारिक क्रांती घडून हिंदु राष्ट्राचा उदय होईल, याची खात्री बाळगा ! – संपादक)

हा देश हिंदूंचा व्हावा, अशी माझी इच्छा आहे आणि जर तशी कोणाची इच्छा नसेल, तर हिंदू म्हणून जगता कशाला ? सरळ सुंता करुन टाका ! – हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे

लोकराज्यांनेच देशाचे वाटोळे केले. घोटाळे करा, भ्रष्टाचार करा आणि लोकराज्याच्या नावाखाली खपवा ! – हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुखांनी हिंदु राष्ट्राचा विचार प्रखर आणि जहाल भाषेत सतत मांडला. हिंदु राष्ट्रात अन्य धर्मांचे लोक नागरिक म्हणून राहू शकतात; मात्र त्यांनी स्वधर्म सांभाळून राष्ट्रावर निष्ठा ठेवायला हवी. ज्यांना हे मान्य नाही, त्यांनी पाकमध्ये चालते व्हावे !

– श्री. उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना.

मी हिंदु आहे असे म्हणणारे एकमेव युगपुरुष !

इकडे आम्हाला सल्ले मिळतात, लोकसंख्या वाढवा. कशाला ? मरायला कि मारून घ्यायला ? असहिष्णुतेचे हे वातावरण नवीन नाही. शिवसेनाप्रमुखांनी कधी त्याची पर्वा केली नाही. मी हिंदु आहे, असे म्हणणारे ते एकमेव युगपुरुष होते.

– श्री. उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना.

भारतियांमध्ये पेटवली आपण, ज्योत राष्ट्र नि धर्मरक्षणाची ।
हिंदु राष्ट्राचे स्वप्न आपुले साकार करू, वेळ आली घेण्या या प्रणाची ॥

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *