सोलापूर धर्मजागृती सभेतील टी. राजासिंह यांचे ज्वलंत विचार ऐकण्याची शिवप्रेमींना उत्सुकता
तुळजापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी या दिवशी जयंती आहे. त्या निमित्ताने येथील दशअवतार मठात घेण्यात आलेल्या बैठकीत शिवबाराजे प्रतिष्ठान अध्यक्षपदी विशाल मगर, तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण कांबळे, खजिनदार अर्जुन धोत्रे, विशाल शेटे, सचिव किशोर पवार, संपर्क प्रमुख आलोक शिंदे यांची निवड करण्यात आली. या वेळी महंत मावजीनाथ महाराज, सर्वश्री शिवबाराजे प्रतिष्ठान संस्थापक आणि बजरंग दल जिल्हा संयोजक अर्जुन साळुंके, शिवबाराजे प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष विकी वाघमारे, बजरंग दल जिल्हा सुरक्षा प्रमुख नितीन जट्टे, सुहास टोले, हिंदु जनजागृती समितीचे अमित कदम, संदीप बगडी यांसह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
बैठकीत अमित कदम आणि अर्जुन साळुंके यांनी सोलापूर येथे ७ फेब्रुवारी या दिवशी होणार्या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. भाजपचे आमदार टी. राजासिंह म्हणजेच ज्याला हिंदूंचा टायगर म्हणतात, त्यांचे हिंदुत्वाविषयीचे ज्वलंत विचार ऐकण्याची प्रत्येकालाच उत्सुकता लागली आहे, असे शिवप्रेमींनी सांगितले. तुळजापूर आणि तालुक्यातील शिवबाराजे प्रतिष्ठाचे एकूण ५०० कार्यकर्ते दुचाकीवरून येणार, असे आश्वासनही या वेळी शिवप्रेमींनी दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात