मंदिराचे जतन आणि जीर्णोद्धार करण्याची भाविकांची मागणी
रहिमतपूर (रघुनाथपूर) (तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा) : अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील गांधी चौकातील ऐतिहासिक उत्तराभिमुखी हनुमान मंदिरालगतचे बांधकाम पाडल्याने भाविकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. (हिंदूंच्या मंदिरांवर तत्परतेने कारवाई करणारे प्रशासन अन्य धर्मियांविषयी मात्र नेहमीच बोटचेपी आणि बघ्याची भूमिका घेते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) नगरपालिकेच्या नियोजित आराखड्यात या ठिकाणी आयर्लंड बांधण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी जेसीबी यंत्राने बांधकामे पाडली जात आहेत. मंदिरातील मूळ सिंहासनाजवळील काही भाग प्रदक्षिणेसाठी ठेवून परिसरातील उर्वरित बांधकाम हटवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
या मंदिरात प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला दहा दिवसांचा मोठा उत्सव साजरा केला जातो. विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि जागृत अशा मंदिरास हानी पोहोचवू नये, तसेच मंदिराचा जीर्णोद्धार करून उत्सवाची परंपरा कायम राखावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात