केवड (जिल्हा सोलापूर) येथे हिंदु धर्मजागृती सभा !
केवड (जिल्हा सोलापूर, तालुका माढा) : छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुन्हा या देशात हिंदुराष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रत्येक हिंदूने धर्माचरण करायला हवे, तसेच धर्मावरील विविध आघात, उदा. धर्मांतरण, लव्ह जिहाद, गोहत्या, मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी आपण संघटित होऊया, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले. २१ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या सभेला ४०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी धर्मप्रेमी श्री. शंभू राजे हिंगमिरे यांनी शंखनाद केला; तर श्री सागर धर्मे यांनी आभारप्रदर्शन केले. सभेचे सूत्रसंचालन श्री. विक्रम घोडके यांनी केले. सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
ही सभा यशस्वी होण्यासाठी येथील धर्मप्रेमी सर्वश्री नाना लटके, प्रशांत धर्मे, योगेश धर्मे, मेजर जोतिराम भोकरे, आशीष लटके, पोपट घुले, सिद्धार्थ लटके, तेजस राऊत, शिवदास पाटील, वैभव पाटील, अण्णा पाटील, श्रीराम हिंगमीरे, गुड्डु राऊत, बालाजी लटके, गणेश चव्हाण, मयूर पाटील, कृष्णा लटके, धनाजी घोडके, मनीष लटके, शंकर जाधव यांसह अनेक धर्मप्रेमींनी घरोघरी जाऊन प्रसार केला आणि विविध सेवांमध्ये सहभाग घेतला.
सभेच्या सांगतेवेळी सोलापूर येथे ७ फेब्रुवारी या दिवशी होणार्या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेची माहिती देण्यात आली. या वेळी अनेक धर्मप्रेमींनी सोलापूर येथे सभेला उपस्थित रहाण्याची सिद्धता दर्शवली.
क्षणचित्र
सभा झाल्यावर दुसर्या दिवशी इयत्ता ७ वीमध्ये शिकणारा कु. धनाजी घोडके या विद्यार्थ्याने समितीच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन सांगितले की, काल झालेली सभा सर्व राजकीय पुढारी आणि हिंदु संघटना यांनी आदर्श घ्यावा, अशी झाली. तसेच सोलापूर येथे होणार्या सभेच्या सेवेला येण्याची सिद्धता दर्शवली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात