बेळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात मागणी
बेळगाव : अनियंत्रित आणि वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील उपलब्ध साधन सुविधा, विकास दर आणि आर्थिक स्थिती यांवर गंभीर परिणाम होत आहे. येत्या काळात ही वाढती लोकसंख्या रोखली नाही, तर पुढे भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊन भारताच्या अखंडता आणि एकात्मता यांवर परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी सर्व नागरिकांसाठी समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यांसाठी तातडीने कायदा करावा, अशी मागणी येथे २१ जानेवारीला करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. ऋषिकेश गुर्जर, अभिनव हिंदु राष्ट्र संघटनेचे श्री. व्यंकटेश शिंदे, चिन्नपट्टणम्चे धर्मप्रेमी श्री. सर्वेश रामनाथकर आणि श्री. विजयानंद नेसरकर यांनीही आपली मते मांडली.
आंदोलनात योग वेदांत सेवा समितीचे श्री. अमर चौधरी, अभिनव हिंदू राष्ट्रचे श्री. सचिन भोसले आणि श्री. संदीप भिडे, भाजपचे अनिल कुरणकर, बसरीकट्टी गावातील श्रीरामसेनेचे कार्यकर्ता श्री. गंगाराम पुजारी, श्री. नागेंद्र बिर्जे, श्री. जोतिबा कोंडुसकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. संगुन रामनाथकर, सदानंद मासेकर, सचिन भोसले, धर्मप्रेमी श्री. कृष्णा प्रधान, श्री. वृषभ चिखलकर, तसेच सनातन प्रभातचे वाचक, सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात