कोल्हापूर : संजय लीला भन्साळी प्रोडक्शन्स यांनी जिल्ह्यातील पन्हाळा येथील मसाई पठार येथे पद्मावत या वादग्रस्त चित्रपटाचे २० दिवस चित्रीकरण केलेे. चित्रीकरणासाठी नियमानुसार शासनाला देय असलेल्या एकूण १ लक्ष ९१ सहस्र ४५८ रुपयांच्या शुल्कापैकी १ लक्ष ६२ सहस्र ७४२ रुपयांचे शुल्क शासनाने वसूल करावे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या या चित्रपटावर बंदी घालावी, या मागण्यांसाठी २३ जानेवारीला येथील शिवाजी चौक येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाच्या ठिकाणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसांचा बंदोबस्त होता, तसेच सीआयडी आणि एल्सीबी (स्थानिक गुन्हे अन्वेषण) विभागाच्या गुप्त शाखेतील साध्या वेषातील पोलीस उपस्थित होते.
आंदोलनानंतर हिंदुत्वनिष्ठांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार श्री. ज्ञानेश्वर शंळकंदे यांना वरील मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी श्री. शंळकंदे यांनी शासनाच्या करमणूक विभागाला हे निवेदन पाठवण्यात येईल, असे सांगितले.
हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले विचार
मोहब्बतसिंग देवल : सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रविष्ट आहे. या चित्रपटाचे नाव पालटले, तरी त्यामध्ये राणी पद्मावती यांचे विडंबन असल्याने मी त्याचा निषेध करतो. शहरातील चित्रपटगृह मालकांनी चित्रपट प्रदर्शित करू नये, तसेच हा चित्रपट कोणीही पाहू नये.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात