Menu Close

अमेरिकेच्या आक्रमणात हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या ठार

सातासमुद्रापार येऊन अमेरिका पाकवर कारवाई करते, तर पाकच्या शेजारी असणारा भारत पाकला केवळ चेतावणी देण्यात धन्यता मानतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

इस्लामाबाद : आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी अमेरिकेने पाकच्या वायव्य प्रांतातील आतंकवादी तळांवर ड्रोनद्वारे जोरदार आक्रमणे केली. या आक्रमणांत हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या एहसान खावेरी याच्यासह अनेक आतंकवादी ठार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अमेरिकेने ड्रोनद्वारे क्षेपणास्त्रांचा मारा करून आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. अमेरिकेने पाकला अफगाणिस्तानात आतंकवादी कारवाया करणार्‍या तालिबानी आतंकवादी, तसेच हक्कानी नेटवर्क यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी चेतावणी दिली होती. तथापि पाकने कारवाई न केल्याने अमेरिकेने पाकमध्ये घुसून ही कारवाई केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *