भिवंडी : हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे अन् धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेची पायाभरणी करणे, यांसाठी भिवंडीवासीय सिद्ध झाले आहेत. २८ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता कामतघर येथील काटेकर मैदान येथे होणार्या हिंदु धर्मजागृती सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी २४ जानेवारीला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केले.
या वेळी श्री. प्रसाद वडके पुढे म्हणाले की, या सभेला श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष आणि भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके, रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर, हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत आदी मान्यवर उपस्थितांना ज्वलंत अन् तेजस्वी विचारांनी संबोधित करणार आहेत. हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात आला असून भिवंडी तालुक्यात २९५ हून अधिक बैठका घेऊन फलक, हस्तपत्रके, होर्डिंग लावून तसेच रिक्शा ठिकठिकाणी फिरवून सभेला येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याचसमवेत फेसबूक, व्हॉट्सअॅप आदी सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत सभेचा विषय पोहोचवला जात आहे.
वारकर्यांनी नामजप, भजन आणि कीर्तन यांच्यासमवेत धर्मावरील आघात रोखण्यासाठी कृतीप्रवण होणे हीच समष्टी साधना ! – ह.भ.प. चिंतामणी महाराज
नामजप, भजन आणि कीर्तन यांच्यासमवेत धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी केलेली कृती आजच्या काळासाठी आवश्यक असलेली समष्टी साधना असून आज सर्व वारकर्यांनी ती करायला हवी. प्रत्येकाने पक्ष, संप्रदाय, संस्था बाजूला ठेवून एक हिंदू म्हणून हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित राहून धर्मकार्यासाठी कृतीप्रवण व्हा.
हिंदूंवरील आघातांना वाचा फोडण्यासाठी सभा महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – उपेंद्र डहाके, कल्याण शहर उपाध्यक्ष, भाजप
हिंदु जनजागृती समिती भिवंडीत धर्मजागृती सभा घेत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हिंदूंवर होणार्या अत्याचारांवर हिंदूंचे संघटन हाच उपाय आहे. हिंदूंवरील आघातांना वाचा फोडण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
अधिवक्त्यांनी हिंदूंच्या बाजूने न्यायालयीन लढा लढण्यासाठी सिद्ध व्हावे ! – अधिवक्ता विवेक भावे, हिंदु विधिज्ञ परिषद
जसे स्वातंत्र्यपूर्वकाळात आपण ब्रिटिशांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढून स्वातंत्र मिळवले होते, तशीच परिस्थिती आज आली आहे. मी आज अधिवक्त्यांना आवाहन करतो की, हिंदूंच्या बाजूने न्यायालयीन लढा लढण्यासाठी सिद्ध व्हा !
या वेळी सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या सौ. दीक्षा पेंडभाजे यांनीही पत्रकारांना संबोधित केले.
भिवंडी येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी आज सायंकाळी ५ वाजता वाहनफेरी !
स्थळ : वर्हाळदेवी मंदिर (प्रारंभ) – छत्रपती शिवाजी महाराज चौक (सांगता)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
भिवंडी येथील हिंदु धर्मजागृती सभेचा फलकांच्या माध्यमातून प्रसार !
भिवंडी (ठाणे जिल्हा) : येथे २८ जानेवारीला होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला विविध भाषांमधून ठिकठिकाणी फलकप्रसिद्धी करण्यात येत आहे. या फलकांमुळे समाजात अनेकांपर्यंत धर्मजागृती सभेचा विषय पोहोचून त्याविषयी जागृतीही होत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात