संभाजीनगर : जोपर्यंत भारत हिंदु राष्ट्र म्हणून उभे रहाणार नाही आणि भगवा फडकणार नाही, तोपर्यंत भारतातील अहिंदु सुखी होणार नाहीत. भारतातील तत्कालीन १० टक्के अहिंदूंना खुश करण्यासाठीच संस्कृत भाषा, भारतीय दिनदर्शिका आणि वन्दे मातरम् यांना डावलले गेले. त्यामुळे आतापर्यंत खोटा इतिहास शिकवला गेला. सद्यस्थितीत सर्व हिंदू एकत्र आल्याविना हिंदूंना जगता येणार नाही, असे सडेतोड प्रतिपादन अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले.
हिंदु सभेचे जनुभाऊ रानडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रहित जनाधार विश्वस्त मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते राष्ट्रगीत या विषयावर बोलत होते. या वेळी विहिंपचे प्रांताध्यक्ष श्री. संजय बारगणे, मंडळाचे अध्यक्ष श्री. शिवाजी शेरकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
श्री. पोंक्षे पुढे म्हणाले, बंकिमचंद्र चटर्जी (चट्टोपाध्याय) यांनी लिहिलेले वन्दे मातरम् हेच राष्ट्रगीत होणार होते. पं. नेहरूंनी नाक मुरडले. ब्रिटिशांच्या अमलाखाली असलेल्या विविध देशांच्या लंडनमध्ये झालेल्या परिषदेमध्ये नेहरू बोलायला उठले, त्या वेळी जन गण मन हे गायले गेले. तेथून भारतात परत आल्यानंतर तेच राष्ट्रगीत म्हणून घोषित केले. अहिंदु नाखुश होतील; म्हणून नेहरूंनीच वन्दे मातरमला राष्ट्रगीताचा मान दिला नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात