Menu Close

पैठणच्या नाथषष्ठी यात्रा अनुदानात नगर परिषदेकडून भ्रष्टाचार झाल्याचे उघड

भ्रष्टाचार होत नाही, असे एक तरी क्षेत्र किंवा शासकीय विभाग आहे का ? हिंदु राष्ट्रात प्रत्येक क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त असेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पैठण (जिल्हा संभाजीनगर) : येथील नाथषष्ठी यात्रेसाठी पैठण नगर परिषदेला उपलब्ध झालेल्या १ कोटी २५ लाख रुपयांच्या शासकीय अनुदानात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. याविषयी नेमलेल्या चौकशी समितीने नोंदवलेल्या निरीक्षणांतून घोटाळा झाल्याचे समोर येत आहे; मात्र हा अहवाल सध्या गोपनीय ठेवण्यात आला आहे.

१. गेल्या वर्षी नाथषष्ठी उत्सवासाठी एकूण १ कोटी २५ लाख रुपयांचे यात्रा अनुदान प्राप्त झाले. वर्ष १९९७ मध्ये तत्कालीन युती शासनातील उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे हे पैठणला आले होते. त्या वेळी आमदार संदिपान भुमरे यांनी नगर परिषदेच्या आर्थिक दुरवस्थेचा संदर्भ देत प्रतीवर्षी यात्रा अनुदानाची आवश्यकता असल्याचे भाषणात सांगितले होते.

२. या मागणीची नोंद घेऊन स्व. मुंडे यांनी तात्काळ अनुदानाची घोषणा करून त्याची पूर्तताही चालू केली. त्यानुसार प्रतिवर्षी वाढीव पद्धतीने अनुदान येण्यास प्रारंभ झाला; मात्र या अनुदानाच्या रकमेत घोटाळा झाला आहे.

३. नाथषष्ठी यात्रा मैदान, गोदावरी नदीचे वाळवंट आणि येणार्‍या दिंड्यांच्या फडाची स्वच्छता करण्याच्या कामाचे देयक चक्क ३४ लाख २१ सहस्र रुपये एवढे काढण्यात आले. एवढ्या पैशांत जेसीबी आणि ट्रॅक्टर यांची खरेदी करता आली असती.

४. महाराष्ट्रातून पायी चालत आलेले वारकरी पैठणला उघड्यावर मुक्काम करतात; परंतु नगर परिषदेने बाहेरून आलेले प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना २ दिवसांच्या जेवणाचे २ लाख ५६ सहस्र ४१५ रुपये आणि लॉजचे देयक २८ सहस्र रुपये दाखवून यात्रा अनुदानाच्या हेतूलाच हरताळ फासला.

५. संतापजनक गोष्ट म्हणजे ६६ सहस्र १५५ रुपयांचा चहा अन् सरबत ‘साहेबां’नी प्राशन केल्याचे नगर परिषदेने दाखवले आहे. याशिवाय विद्युत आणि पाणीपुरवठा साहित्य खरेदी यांवर लाखो रुपयांचा खर्च नमूद केला आहे.

६. अडीच लाख रुपयांची तुरटी आणि ब्लीचिंग खरेदी केल्याची कागदोपत्री नोंद केली. यात्रा काळात १ लाख रुपयांचे डिझेल खरेदी केल्याचे दाखवून नगर परिषद कर्मचार्‍यांना चक्क सहस्रो रुपयांची ‘आगाऊ रक्कम’ धनादेशाद्वारे देण्यात आल्याचे नमूद केलेले आहे.

७. नगर परिषदेनेच ३ लाख ३९ सहस्र ५३० रुपयांचा खर्च डिजिटल फलकांवर दाखवला आहे.

८. यात्रा अनुदान खर्च करतांना वारकर्‍यांना डावलण्यात आले. लाखो रुपयांची रक्कम कागदोपत्री दाखवून संगनमताने अनुदान लाटण्यात आले.

९. या भ्रष्टाचाराविषयी जिल्हा प्रशासनाने ३ सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. पैठण-फुलंब्रीचे एस्डीएम् भाऊसाहेब जाधव, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पैठण उपविभागाचे उपअभियंता रवींद्र बोरकर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (संभाजीनगर)चे लेखापाल यांनी ही चौकशी पूर्ण करून काही मास उलटून गेले आहेत. त्यांनी ‘बंद लिफाफ्या’तून जिल्हा प्रशासनाकडे चौकशी अहवाल सादरही केला आहे; मात्र हा अहवाल गोपनीय ठरवून अद्यापही जाहीर केला गेला नाही.

१०. गेल्या नाथषष्ठीत हा घोटाळा होऊनही या वर्षी पुन्हा दीड कोटी रुपयांचे अनुदान येणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *