गदग (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा
गदग (कर्नाटक) : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याने जगाला व्यापलेले आहे. या संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेचे एकमेव ध्येय ठेवून देशाच्या कानाकोपर्यात हिंदु धर्माचा प्रसार करत आहेत. त्यांच्या विरोधात अनेक खोटे आरोप, खोट्या अफवा पसरवण्यात आल्या; परंतु त्याची तमा न बाळगता आणि माघार न घेता भगवंतावर अखंड श्रद्धा ठेवून ते ध्येयाच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहेत. आपणही हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध होऊया, असे उद्गार श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील म्युन्सिपल हायस्कूलच्या मैदानात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. विदुला हळदीपूर, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ता श्री. गुरुप्रसाद गौडा उपस्थित होते. या सभेला १ सहस्र ५०० हून अधिक हिंदू उपस्थित होते.
हिंदु नेत्यांच्या मारेकर्यांना कोणतीही शिक्षा होत नाही ! – श्री. गुरुप्रसाद गौडा
आज देशात केवळ मतांसाठी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यात येत आहे. भर दिवसा हिंदु नेत्यांच्या निर्घृण हत्या होत आहेत. असे असतांना मारेकर्यांना कोणतीही शिक्षा होत नाही. हे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही.
आम्ही खोट्या आरोपांना घाबरत नाही ! – सौ. विदुला हळदीपूर
सौ. विदुला हळदीपूर म्हणाल्या, देशाला सात्त्विक बनवून रामराज्याची अनुभूती समाजाला देण्यासाठी सनातन संस्था कार्यरत आहे. विरोधकांकडून संस्थेवर अनेक खोटे आरोप करण्यात येत आहेत; परंतु या खोट्या आरोपांना आम्ही घाबरणार नाही. आम्हाला भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद आहेत.
रुग्णांचे जीवितरक्षण आणि मर्मआघातादी विकारांवरील प्रथमोपचार या कन्नड भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन
या हिंदु धर्मजागृती सभेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत रुग्णांचे जीवितरक्षण आणि मर्मआघातादी विकारांवरील प्रथमोपचार या कन्नड भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात