बारामती
१४९ अन्वये व्यापार्यांना नोटीस (सूचना) देऊ ! – पोलीस उपनिरीक्षक अपसुंदे, बारामती
येथील पोलीस उपनिरीक्षक अपसुंदे आणि उपविभागीय दंडाधिकारी हेमंत निकम यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पोलीस उपनिरीक्षक अपसुंदे यांनी ‘सर्व व्यापार्यांना १४९ अन्वये नोटीस देऊ’, असे आश्वासन दिले आणि व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांनाही भेटण्यास सांगितले.
राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी एका शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वीतील ८२५ विद्यार्थी उपस्थित होते. सौ. सुजाता ढवाण यांनीही एका शाळेत १५० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पंढरपूर
येथील प्रांत अधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार अविनाश पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अविनाश पवार यांनी ‘शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रबोधन करणार्या कृती समितीची पंढरपूर येथेही स्थापना करू’, असे आश्वासन दिले.
या वेळी श्री. वृषभ फुलारे, हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण डिंगरे, वीर बाजीप्रभू प्रतिष्ठानचे ओंकार कुलकर्णी, चैतन्य रानरूई, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिशेखर पाटील, सनातन संस्थेचे श्री. मोहन लोखंडे उपस्थित होते.
केर्ले (जिल्हा कोल्हापूर)
राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी केर्ले येथील ३ शाळांच्या मुख्याध्यापकांना निवेदन
येथे गावातील श्री हनुमान हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. गायकवाड, कन्या विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. कुलकर्णी, कुमार विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री. गोसावी यांना निवेदन दिले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री रामभाऊ मेथे, आदर्श भोसले, अविनाश अशोक पोवार, महेश आतिग्रे, शुभम गुरव, विश्वजित बुवा, सिद्धेश पाटील, रणधीर किल्लेदार आदी उपस्थित होते.
ठाणे
डोंबिवली पूर्व भागातील रामनगर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी धुमाळ यांना निवेदन देण्यात आले. या उपक्रमात श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, सह्याद्री प्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. जनार्दन कुलकर्णी सहभागी झाले होते. ठाणे शहरातील राबोडी पोलीस ठाण्यातही साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. रघुनाथ शेवाळे यांनाही निवेदन देण्यात आले.
मुंबई, पालघर
प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांना निवेदन
नालासोपारा (प.) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांना तसेच मुख्य तहसीलदार, वसई यांना आणि नालासोपारा (पू.) येथील तुळींज पोलीस ठाणे येथे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रप्रेमी श्री. प्रमोद वर्मा, अविनाश रॉय, जयेश धोंडे, श्री. राहुल पांडे, श्री. अमित निंबाळकर,
श्री. अमित कापसे, श्री. प्रतिक सांगले आणि समितीचे श्री. प्रसाद काळे उपस्थित होते. मुलुंड पोलीस ठाणे, भांडुप पोलीस ठाणे, तसेच मुलुंड तहसीलदार यांनाही निवेदन दिले. पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नवनाथ जरे आणि पालघर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनाही निवेदन देण्यात आले.
पिंपरी-चिंचवड (पुणे)
१. भोसरी येथील स्पाईन रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना आबा पाटील (छावा संघटना), विश्वनाथ टेमगिरे (शिवसेना उपविभाग प्रमुख), धनंजय कचरे, श्री. बाळा धावडे, श्री. क्षीरसागर आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
२. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनाही निवेदन देण्यात आले.
३. महापौर श्री. नितीन काळजे आणि आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. धनंजय करचे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे आणि अशोक कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
४. राजगुरूनगर भागातील नायब तहसीलदार राजेश कानसकर यांना श्री. राजेंद्र गोडबोले, सौ. मालती कोहिनकर, श्रीमती छाया कौदरे, सौ. कमल निघोट यांनी निवेदन दिले. त्यासह जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ आणि २, हुतात्मा राजगुरूनगर विद्यालय, शेठ केशर चंद शाळा येथेही निवेदन देण्यात आले.
५. जुन्नर येथील पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमरापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगर येथे निवेदन देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात