आतंकवाद्यांना नव्हे, तर राष्ट्र-धर्म जागृतीचे कार्य करणार्या समितीला नोटीस बजावणार्या पोलिसांचा यातून हिंदुद्वेषच दिसून येत नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोल्हापूर : हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे यांना पोलिसांनी १४९ अन्वये नोटीस बजावली आहे. या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे की, वादग्रस्त ‘पद्मावत’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील विविध चित्रपटगृहांत हा चित्रपट दाखवण्यात येत आहे. या चित्रपटाला सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. त्या आदेशाचे पालन करण्यासाठी आणि कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणाची हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अन्यथा तुम्ही आणि तुमचे समर्थक यांच्याकडून अनुचित प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ही नोटीस जुना राजवाडा पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे यांना २५ जानेवारीला बजावली आहे. या पोलीस ठाण्यात हद्दीत ‘उर्मिला’ चित्रपटगृह येते. त्या चित्रपटगृहात ‘पद्मावत’ हा चित्रपट दाखवण्यात येत आहे. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी ही नोटीस बजावली आहे. (हिंदु जनजागृती समिती नेहमी वैध मार्गाने आंदोलन करत असतांनाही पोलिसांनी श्री. मधुकर नाझरे यांना अशी नोटीस देणे आश्चर्यकारक आहे. अशी नोटीस पाठवून पोलीस एकप्रकारे राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य करणार्या समितीच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असे होत नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात