१. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत अडथळा ठरणारे मिर्झाराजे जयसिंहांचे वैचारिक वंशज !
हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्र आहे. केवळ संसदेत ५० टक्क्यांहून अधिक खासदार हिंदू आहेत म्हणून असे म्हणतो कि हिंदुस्थानात निरंतरपणे बहुसंख्य हिंदू आहेत म्हणून म्हणतो ? असे असेल, तर हा केवळ आपला भ्रम आहे. जोपर्यंत मिर्झाराजे जयसिंहांचे वैचारिक वंशज बहुसंख्येने कार्यरत आहेत, तोपर्यंत तरी हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्र होणे कठीण दिसते. – माधव बिवलकर (संदर्भ : मासिक स्वातंत्र्यवीर, दिवाळी २०१४)
२. जगातील राष्ट्रव्यवहारतज्ञांनी संमती दर्शवलेला राष्ट्राच्या जातीसंबंधी विश्वव्यापी नियम
कोणत्याही देशात त्या देशासाठी मूळचे धनी हे जातीय बहुसंख्यांक लोक असतात आणि ते राष्ट्र त्या बहुसंख्यांक जातीचे राष्ट्र असते, हा विश्वव्यापी नियम आहे. हीच रुढी आणि इतिहास असून या गोष्टीला जगाची मूकच नव्हे, तर जगातील राष्ट्रव्यवहारतज्ञांची, म्हणजे राष्ट्रसंघाची (लीग ऑफ नेशन्सची) संमती आहे.
३. हिंदुस्थान हे संविधानिकदृष्ट्या हिंदु राष्ट्र होण्यासाठी काय करायला हवे ?
जातीय बहुसंख्यांक लोकांचे राष्ट्र (हिंदु राष्ट्र) गणले जाण्यासाठी संविधानात पुढील तरतुदींची नोंद करणे आवश्यक असते.
३ अ. अल्पसंख्यांक ही संज्ञा सुस्पष्ट करणे : जातीय बहुसंख्यांक लोक असणार्या मूळ धनी जातीशी धर्म, संस्कृती आणि भाषा या दृष्टीने जेे भिन्न, निम्न म्हणून परराष्ट्रीय आहेत अन् ते देशात स्थायी निवासी झालेले आहेत, अशांना अल्पसंख्यांक अशी संज्ञा दिली जाते.
३ आ. अल्पसंख्यांकांना राष्ट्रात अंतर्गत व्यवहारापुरतेच भाषा, धर्म आणि संस्कृतीसंबंधी गोष्टींत संरक्षण दिलेले असणे : अल्पसंख्यांकांना त्यांच्या त्या विभिन्न वा परकीय राष्ट्रीयतेला त्या राष्ट्राचे बहुसंख्य लोक चिरडून टाकण्याचा संभव राहू नये; म्हणून त्या अल्पसंख्यांना त्यांच्या त्या अंतर्गत व्यवहारापुरतेच भाषा, धर्म नि संस्कृतीसंबंधी गोष्टींत संरक्षण दिलेले असावे.
३ इ. अल्पसंख्यांकांनी राष्ट्राची भाषा, इतिहास, परंपरा, नियम, अभिमान केंद्रे, राष्ट्रपुरुष आदींना स्वराष्ट्रीय नात्याने स्वीकारलेच पाहिजे ! : राष्ट्रीय कार्यक्षेत्रात त्यांनी आपल्या भाषाधर्मादिकांचा बीचमें मेरा चाँदभाई न घुसडता त्या त्या राष्ट्राच्या भाषा, इतिहास, परंपरा, नियम, अभिमान केंद्रे, राष्ट्रपुरुष आदिक स्वराष्ट्रीय नात्याने स्वीकारलेच पाहिजेे.
३ ई. वरील गोष्टी स्वीकारणार्या अल्पसंख्यांकांना राष्ट्रात धनी म्हणून नव्हे; पण धन्यासारखे रहाता येईल !
४. …तर वर्ष १९४७ मध्येच हिंदुस्थानचे हे हिंदु राष्ट्र झाले असते !
वरील प्रकारच्या तरतुदी संविधानात किंवा सुयोग्य कायद्याद्वारे केल्या गेल्या असत्या, तर हिंदुस्थानचे हे हिंदु राष्ट्र झाले असते. आता ती संधी गेल्याने सध्या तरी आपण स्वीकारलेल्या भारतीय संविधानाच्या चौकटीचा विचार न करता हिंदुस्थानचे हिंदु राष्ट्र होणे हे अशक्यप्रायच वाटत आहे.
– क्रांतीवीर बाबाराव सावरकर (संदर्भ : हिंदु राष्ट्र – पूर्वी, आता आणि पुढे, तृतीय आवृत्ती २००९, पान क्र. १८२-१८३) ॐ
हिंदुस्थानची अविभाज्यता राखणे, हे आमच्या राजकीय कार्यामध्ये पहिले आणि मुख्य लक्ष्य असले पाहिजे ! – स्वातंत्र्यवीर सावरकर
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात