माघी गणेश जयंतीनिमित्त मानखुर्द येथे प्रवचन
मुंबई : ‘हिंदूंची दुःस्थिती पालटण्यासाठी प्रत्येक हिंदूने साधना करून धर्मशिक्षण घेतले पाहिजे आणि आपल्या पाल्यांवरही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संस्कार करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सिद्ध झाले पाहिजे’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. मानखुर्द येथील शिवनेरी नगर वेल्फेअर सोसायटीच्या वतीने माघी श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचनाच्या वेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वन्दे मातरम् या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमास आरंभ करण्यात आला. परिसरातील ६० हिंदूंनी या प्रवचनाचा लाभ घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात