Menu Close

भाजपचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना भिवंडी येथील हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण

डावीकडून आमदार श्री. नरेंद्र पवार, श्री. श्रीराम लुकतुके, श्री. माधव साठे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, डॉ. उपेंद्र डहाके, आमदार श्री. गणपत गायकवाड आणि श्री. अभिजित भोजने

कल्याण : भिवंडी येथे २८ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ जानेवारीला कल्याण येथे महाराष्ट्राचे भाजपचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील एका कार्यक्रमासाठी आले होते. त्या वेळी डॉ. रणजीत पाटील, कल्याणचे भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार आणि कल्याण पूर्वेचे भाजपचे आमदार श्री. गणपत गायकवाड यांना भिवंडी येथील हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले. या वेळी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी, ‘‘सनातनच्या साधकांच्या त्यागाविषयी मला नितांत आदर आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य मी जाणून आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *