इस्लामाबाद : पाकमधील जमात-उद-दावा या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याने अटकेच्या भीतीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे शिष्टमंडळ लवकरच पाकचा दोन दिवसीय दौरा करणार असून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे सर्व नियम योग्य प्रकारे पाळतो कि नाही, याची पाहणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर अटक टाळण्यासाठी सईदने न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज प्रविष्ट केला आहे. भारत आणि अमेरिका यांच्या दबावामुळे मला अटक होण्याची शक्यता आहे, असे सईदने या अर्जात म्हटले आहे. (हाफिज सईदवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या शिष्टमंडळाकडे मागणी करणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पाकचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी हाफिज सईद आणि त्याच्याशी संबंधित संस्थांची संपत्ती जप्त केली जाईल, याचा पुनरुच्चार केला आहे. या वेळी न्यायालयात त्याने मी पाकला १४२ शाळा, तसेच ३ विद्यापिठे दिली आहेत, असे सांगत स्वत: सामाजिक कार्य करत असल्याचा आव आणला. (यातून आतंकवादी निर्माण न झाल्यासच नवल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात