Menu Close

बांगलादेशमध्ये श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना

बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने असुरक्षित ! भारतातील हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण करू न शकणारे सरकार आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना बांगलादेशातील हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण कसे करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

ढाका : बांगलादेशच्या ठाकुरगाव जिल्ह्यातील जगन्नाथपूर येथे नुकतेच धर्मांधांनी श्री सरस्वती मंदिरावर आक्रमण केले. या वेळी श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना केली. श्री. जोतिषचंद्र बर्मन यांनी या प्रकरणी ठाकुरगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली.

बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अधिवक्ता रवींद्र घोष यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ठाकुरगाव पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला. मंदिरात घुसून मूर्तींची विटंबना करणार्‍या गुन्हेगारांना तातडीने अटक करावी, अशी मागणी श्री. घोष यांनी या वेळी केली. या प्रकरणी आरोपी महंमद खदिमुल इस्लाम (वय २८ वर्षे ) याला अटक करण्यात आली आहे, तसेच त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिकार्‍यांनी अधिवक्ता घोष यांना दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *