Menu Close

बांगलादेशच्या ढाका शहरात धर्मांधांनी हिंदु कुटुंबाला त्याच्या वडिलोपार्जित जागेतून बलपूर्वक बाहेर काढले

धर्मांधांचा उद्दामपणा ! जे सरकार भारतातील हिंदूंचे रक्षण करूशकत नाही, हे बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण कसे करणार ? जगभरातीलहिंदूंचे रक्षण होण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

ढाका : बांगलादेशच्या ढाका शहरातील शामपूर मौझा येथे श्री. मेघलाल दास यांच्या कुटुंबाला त्यांच्या वडिलोपार्जित जागेतून धर्मांधांनी बलपूर्वक बाहेर काढले, तसेच श्री. मेघलाल दास यांच्या ७ भाडेकरूंनाही ती जागा सोडून जाण्यास भाग पाडले. बांगलादेश अव्हामी लिगचे उपाध्यक्ष महंमद शफिकूर रहमान हे इतर धर्मांधांच्या साहाय्याने श्री. मेघलाल दास यांच्या जमिनीत अवैध्यरित्या घुसले आणि या सर्वांनी हिंदु कुटुंबियांना मारहाण केली. त्यांच्या घराची मोडतोड केली, तसेच घरातील मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम पळवली.

पीडित हिंदु कुटुंबियांनी बांगलादेश मायनॉरिटी वॉचशी संपर्क साधून साहाय्य करण्याची विनंती केली. बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अधिवक्ता रवींद्र घोष यांनी गौतम एदबोर, दिलीपकुमार राय आणि रंजन मंडळ यांच्यासह घटनास्थळाला भेट देऊन चौकशी केली. त्यांनी कादमतोली पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क साधला. हिंदु कुटुंबाच्या जमिनीवर अवैध्यरित्या नियंत्रण मिळवणार्‍या आरोपींना अटक करण्यात यावी आणि पीडित हिंदु कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी पोलीस अधिकार्‍यांकडे केली. अल्पसंख्यांक हिंदूंची घरे आणि जमिनी अवैध्यरित्या बळकावणार्‍या समाजकंटकांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, तसेच हिंदु कुटुंबांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पीडित हिंदूंनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन धर्मांधांनी मारहाण आणि घराची तोडफोड केल्याचा आरोप केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *